33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोर तालुक्यातील कंटेनमेंन्ट झोन मधील बंदी उठविली

अर्जुनी मोर तालुक्यातील कंटेनमेंन्ट झोन मधील बंदी उठविली

0
430

blank

अर्जुनी मोर.(संतोष रोकडे)दि.26ः तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. 31 पाझेटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्याने येणे जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले होते.मात्र सध्या सर्व रुग्ण बरे झाल्याने अर्जुनी मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी तालुक्यातील कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या गावांमधील प्रतिबंध उठविण्याचे आदेश गुरुवार(दि.25)ला दिले .
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबी, आसोली, अरुणनगर, खामखुरा, करांडली, दिनकरनगर ,आंभोरा, तुकुमनारायण, सिलेझरी, अरततोंडी, नगरपंचायत अर्जुनी-मोर येथील प्रभाग क्रमांक 3 व 4 (बरडटोली )मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव इतर भागात पसरू नये याकरिता ही गावे कंटेनमेंट झाेन म्हणून घोषित करण्यात आली होती..मात्र तालुका आरोग्य अधिकारी अर्जुनी-मोर यांनी प्रतिबंध क्षेत्रातील सर्व कोरोना बाधित रुग्ण हे कोरोना संसर्गापासून पूर्णपणे बरे झाले आहे. तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटचा रुग्ण सहा जून रोजी कोरोणा मुक्त होऊन घरी परतला आहे.त्यानंतर या प्रतिबंधित गावांमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नव्याने आढळलेला नाही, असा अहवाल सादर केला.त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कंटेनमेंट झोन म्हणुन घोषित केलेल्या उपरोक्त गावांमधील प्रतिबंध उठविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी 25 जून रोजी काढले आहेत.

blank