25.8 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ कुरखेडा, चामोर्शी तालुक्यात आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

कुरखेडा, चामोर्शी तालुक्यात आढळले दोन कोरोना पॉझिटीव्ह

0
293

गडचिरोली,दि.२६: नवी दिल्ली येथून आलेले दोन युवक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. हे युवक कुरखेडा व चामोर्शी तालुक्यातील आहेत.नवी दिल्ली येथून जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वर पोहचली असून, ४६ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत,तर १७ सक्रिय रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरु आहेत.