33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ आज पुन्हा नव्या सोळा बाधित रुग्णांची भर

आज पुन्हा नव्या सोळा बाधित रुग्णांची भर

दहा रुग्ण कोरोनातून मुक्त

0
722

blank

गोंदिया दि.06 – जिल्ह्यात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून आज 6 जुलै रोजी प्रयोगशाळेच्या प्राप्त अहवालात 16 नवे कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आलेे आहे.तर 10 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

आज जिल्ह्यात आढळलेल्या सोळा कोरोना बाधित रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील 5 रुग्ण असून यातील तीन रुग्ण गोंदियाच्या कुंभारेनगर येथील तर दोन रुग्ण फुलचुर येथील आहे.तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथील एक रुग्ण, सालेकसा तालुक्यातील सालेकसा येथील एक रुग्ण,परदेशातून आल्यानंतर जिल्ह्यात बाधित आढळून आलेल्या नऊ रुग्णामध्ये कुवेत या देशातून आलेले 8 आणि कतार या देशातून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

आज जे दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील आठ आणि सालेकसा तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.गोंदिया शहरातील कुंभारेनगर येथील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 15 आणि गोंदिया तालुक्यातील डोंगरगाव येथील रुग्ण संख्या 13 इतकी झाली आहे. हे दोन्ही क्षेत्र हॉटस्पॉट होत आहे.

गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत कोरोना संशयित 4277 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.यामध्ये 183 रुग्ण कोरोना बाधित आढळले. तर 115 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.211 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील संस्थात्मक विलगिकरण कक्षात 364 आणि गृह विलगिकरणात 1095 अशा एकूण 1459 व्यक्ती विलगिकरणात आहे.

क्रियाशील कंटेंनमेंट झोन आता तेरा असून यामध्ये गोंदिया तालुका – मुंडीपार, फतेहपूर, डोंगरगाव, शेजगाव,पारडीबांध कुंभारेनगर (गोंदिया) सालेकसा तालूका – पाऊलदौना व पाथरी,तिरोडा तालुका -तिरोडा (सुभाष वार्ड),बेरडीपार आणि सडक/अर्जुनी तालुका – राका,सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.

कोरोना बाधित क्रियाशील रुग्णांची संख्या आता 66 झाली असून तालुकानिहाय ती पुढील प्रमाणे आहे.गोंदिया तालुका – 41, तिरोडा तालुका – 4 सडक/अर्जुनी तालुका – 4 असे आहेत.तर परदेशातून आलेले 17 रुग्ण आहेत यामध्ये दुबई या देशातून 7,किरगीस्थान,कुवैत – 8 आणि कतार या देशातून आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

blank