
खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.09ः-येत्या 11 जुर्ले रोजी गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या सर्व पंचायत समित्या व 14 जुर्ले रोजी जिल्हा परिषद पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपत आहे.त्यातच सध्या कोवीड-19 मुळे राज्यातील निवडणुकांना स्थगीती देण्यात आल्याने या दोन्ही जिल्हा परिषदांचा कार्यभार सुरळीत चालविण्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत प्रशासक नेमण्याचे आदेश 8 जुर्ले रोजी काढले आहेत.जिल्हा परिषद,पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 91 ब व 75 ब च्या कलमांचा वापर करीत जिल्हा परिषद अधिकारांचा वापर करण्यासाठी व कर्त्यव पार पाडण्यासाठी प्राधिकृत अधिकारी(प्रशासक) म्हणून अधिकार देण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी दिले आहेत.




