23.6 C
Gondiā
Sunday, July 19, 2026
Home राजकीय नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चाला नेत्यांची दांडी

नागपूरमध्ये काँग्रेसच्या मोर्चाला नेत्यांची दांडी

0
22

नागपूर दि. ११: शेतकऱ्यांच्या मागणीसाठी नागपूरातले दिग्गज काँग्रेस नेते उत्साही नसल्याचं दिसून आलं आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसच्या या आंदोलनाला मात्र विलास मुत्तेमवार, मुकुल वासनिक, नितीन राऊत, अनीस अहमद, राजेंद्र मुळक, सतीश चतुर्वेदी अविनाश पांडे यापैकी एकही नेता उपस्थित नव्हता. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
या आंदोलनात शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली. पण काँग्रेस नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यानं हे आंदोलन फिकं पडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच शहरात घेरण्यात काँग्रेसला स्वारस्य नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.