देवरी तालुक्यात अतिवृष्टी जिल्ह्यात सरासरी ३२६.५ मि.मी. पाऊस

0
13

गोंदिया, दि. ११ : जिल्ह्यात १ जून ते ११ जुलै २०१५ या कालावधीत १०७७४.८ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी ३२६.५ मि.मी. इतकी आहे. आज ११ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ मंडळात १३५६.४ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ४१.१ मि.मी. इतकी आहे.
११ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- १८९.२ मि.मी. (२७.१ मि.मी.), गोरेगाव तालुका- १५४.४ मि.मी. (५१.५ मि.मी.), तिरोडा तालुका- १८९.६ मि.मी. (३७.९ मि.मी.), अर्जुनी मोरगाव तालुका- १९८.३ मि.मी. (३९.६ मि.मी.), देवरी तालुका- २५१.० मि.मी. (८३.६ मि.मी.), आमगाव तालुका- १३१.० मि.मी. (३२.७ मि.मी.), सालेकसा तालुका- ८८.७ मि.मी. (२९.६ मि.मी.) आणि सडक अर्जुनी तालुका- १५४.२ मि.मी. (५१.४ मि.मी.) असा एकूण १३५६.४ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ४१.१ मि.मी. इतकी आहे. देवरी तालुक्यातील मुल्ला – ७५ मि.मी., देवरी – ९९ मि.मी. व चिचगड – ७७ मि.मी. या तिन्ही मंडळात अतिवृष्टी झाली असून देवरी तालुक्यात २५१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ८३.६ मि.मी. असल्यामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.