
तुमसर,दि.28ः -तालुक्यातील राजापूर येथे घडलेल्या अमानवीय घटनेचा तपास करण्यासाठी गावात गेलेले आणि आरोपींना ताब्यात घेऊन तपास करणारे तुमसरचे पोलिस निरीक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळल्याने पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे.सदर पोलिस निरिक्षक हे आरोपींना घेऊन तुमसर न्यायालयात हजर झाले होते.त्यामुळे न्यायालय परिसर सुध्दा सील करण्यात आले आहे.तर राजापूर येथे पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी हे सर्व त्याठिकाणी गेलेले होते.त्यावेळी पोलिस निरिक्षकांशी संपर्क आल्याने हे सर्व अधिकारी होमक्वारंटाईन झाले असून सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वाब घेणे सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली.




