42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

0
112

भंडारा,दि. 29 :– शासनाने खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम 2020 करिता दिनांक 31 जुलै, 2020 अशी आहे.

         योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यामुळे अंतिम मुदतीच्या पुर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतक-यांना सहभागी होता येणार नाही. योजनेत सहभागी होण्याची अंतीम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्‍वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बॅक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक 31 जुलै, 2020 पर्यन्त विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.

         राज्यातील वनहक्क जमिनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सुचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपनींना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा.

blank