
गोंदिया,दि.१०: – महाराष्ट्र राज्य उच्च माध्य./क.म.वि.कृति संघटना गोंदियाच्यावतीने आपल्या विविध मागण्यासांठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानापर्यंत पायदळ आक्रोश दिंडी काढून निवेदन सादर करण्यात आले. ८ ऑगस्ट रोजी निघालेली दिंडी ९ ऑगस्टला दुपारी २ वाजता साकोली तालुक्यातील सुकडी येथे पोचली.या दिंडीचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्रा.मोतिदास उके, उपाध्यक्ष सुनिल डोंगरे, कार्याध्यक्ष मनिष शहारे,सहसचिव प्रा.डि.सी.कटरे,सहकोषाध्यक्ष रविंद्र जगने यांनी केले.विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलकांच्या मागण्या एैकून घेत त्यांच्या निवेदनावर त्वरीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून मानधनाचा प्रश्न सोडविण्याची qवनती केली तसेच बुधवारला मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन शिष्टमंडळालादिले. १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र १४६+१६३८ कनिष्ठ महाविद्यालयांना २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १०७ कोटींचे मंजुर झालेल्या अनुदान निधीच्या वितरणाचा शासन निर्णय काढून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा करण्याचे व अघोषित क. महाविद्यालयांना अनुदानासह घोषित करण्याबाबदच्या निवेदनावर कार्यवाही करण्यात यावे यासाठी पुढाकार घेणार असल्याचे पटोले यांनी आंदोलकांना सांगितले.या पायदळ आक्रोश दिंडी आंदोलनात प्राचार्य एस.डब्लु.कुरेशी,संघटनेचे सचिव प्रा.हेतराम चुटे,स/अर्जुनी ता.अध्यक्ष मनोज मस्के,प्रा. भाष्कर लांजेवार, प्रा. रवि कटरे,प्रा.प्रविण मेंढे,प्रा.मधु दिहारी,प्रा.एम.एल.पटले,प्रा.
मो/अर्जुनीचे तालुका प्रमुख प्रा.एम.जे.रामटेके,प्रा.आर.झे
तसेच महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/क.म.वि.कृति संघटना गोंदियाचे सर्व पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.





