29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्ह्य़ात दुचाकीचे सर्वांत जास्त अपघात – जिल्हाधिकारी

जिल्ह्य़ात दुचाकीचे सर्वांत जास्त अपघात – जिल्हाधिकारी

0
380

blank

गडचिरोली,दि.12ः- जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील अपघातांविषयी आढावा घेतला. यामध्ये जिल्हयात जानेवारीपासून आत्तापयर्ंत झालेल्या ६१ अपघातांविषयी माहिती घेतली. यामध्ये एकूण ६३ वाहनाधारकांचा मृत्यू झाला पैकी सर्वांत जास्त ३७ मृत्यू दुचाकिस्वारांचे आहेत. यामधील ३७ सर्वच मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींनी हेलमेटचा वापर केला नव्हता. त्यामूळे जिल्हयात हेल्मेट वापराबाबत प्रक्रिया राबवा, जनजागृती करा अशा सूचना त्यांनी वाहतूक व पोलीस विभागाला दिल्या. तसेच एकूण ६१ अपघातांमध्ये ३४ अपघात दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामूळे जिल्हयात हेल्मेट सक्तीबाबत प्रक्रियेला सुरूवात करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सुरूवातीला एक महिना वाहन धारकांची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर संपुर्ण जिल्हयात हेल्मेट सक्ती लागू करण्याबाबत निर्णय घेणेत येईल असे जिल्हाधिकारी यांनी बैठकित सांगितले. या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, विवेक मिर्शा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सुरेश साखरवाडे, पुनम गोरे वाहतूक शाखा गडचिरोली, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, डॉ. जयंत पर्वते शल्यचिकित्सक आरोग्य विभाग गडचिरोली, गोरख गायकवाड, होम डीवायएसपी पोलीस अधीक्षक कार्यालय उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्वात जास्त आपघातही ग्रामीण रस्त्यांवरच झाले असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये ६१ पैकी २५ राज्यमार्गावर, ८ राष्ट्रीय मार्गावर तर उर्वरीत २८ हे ग्रामीण भागात झाले आहेत. जास्त वेगाने दुचाकी चालविणे, अल्कोहोल सेवन करून गाडी चालविणे ही या अपघातांमधील प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले. यापुढे प्रत्येक अपघाताचे मायक्रो स्तरावर विेषन करून अहवाल तयार करावे. जणेकरून त्यावरून ब्लॅक स्पॉट(वारंवार अपाघाताचे ठिकाण) ठरविण्यास मदत होईल. तसेच अपघातांच्या विेषणावरून नेमक्या चूका कोणत्या आहेत व त्यावर उपाययोजना काय काय राबविता येतील याचा अभ्यास करता येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

blank