23.5 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News उत्तराखंडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

उत्तराखंडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का

0
28

वृत्तसंस्था
डेहराडून दि.१९:- उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्याला आज (रविवार) पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यासह आजूबाजूच्या बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 मोजण्यात आली आहे. पहाटे सव्वापाचच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का बसला.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. गंगोत्रीकडे जाणारा महामार्ग दरड कोसळल्याने बंद झाला आहे. तर, यमुनोत्रीकडील मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अल्मोंडा येथे ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे.