36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ 19 रुग्णांची भर : 428 रुग्णांची कोरोनावर मात

19 रुग्णांची भर : 428 रुग्णांची कोरोनावर मात

266 अहवालाची प्रतिक्षा क्रियाशील रुग्ण संख्या 262

0
1881

blank

गोंदिया दि.13 – ऑगस्ट महिन्यात दररोज कोरोना संसर्ग झालेले रुग्ण सातत्याने आढळून येत असल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली असून  आज 13 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात नवे 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर 10 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधित रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 727 वर पोहोचली आहे.आता क्रियाशील रुग्ण संख्या 262 झाली आहे.

जिल्ह्यात जे 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आहे, त्यामध्ये गोंदिया तालुक्यात 4 रुग्ण आढळले आहे. यामध्ये  गोंदिया शहरातील सिव्हील लाईन येथील एक रुग्ण, दवनीवाडा, एकोडी व काटी येथील प्रत्येकी एक रुग्ण. तिरोडा तालुक्यातील सात रुग्णामध्ये रामनगर तिरोडा येथील दोन रुग्ण, बिरसी येथील व सर्रा येथील प्रत्येकी दोन रुग्ण, एक रुग्ण गराडा येथील आहे.4 रुग्ण गोरेगाव तालुक्यात आढळले असून कलपाथरी व घोटी येथील प्रत्येकी एक रुग्ण व तुमखेडा येथील दोन रुग्णाचा समावेश आहे.

आमगाव तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये आमगाव, बनगाव, डोंगरगाव व कालीमाटी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनावर मात करुन आज 10 रुग्ण घरी परतले आहे. यामध्ये गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर 9 रुग्ण तिरोडा तालुक्यातील असून 7 रुग्ण हे मुंडीपार व 2 रुग्ण घोगरा येथील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 12147 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 11069 नमुने निगेटिव्ह आले. तर 597 नमुने पॉझिटिव्ह आढळून आहे. 266 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 215 नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे.

गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून 597 आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून 125 तर पाच रुग्ण हे जिल्ह्याबाहेर पॉझिटिव्ह आढळले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 727 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 224 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 931 व्यक्ती अशा एकूण 1155 व्यक्ती विलगिकरणात आहेत. या सर्वांवर प्रशासनाची देखरेख आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 6105 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 5980 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 125 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात 230 चमू आणि 131 सुपरवायझर 118 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.ज्या गावात आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र 118 आहेत.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा व गोंदिया शहरातील यादव चौक, रेलटोली, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली, क्षत्रिय मार्ग श्रीनगर, सिंधी कॉलोनी, शास्त्री वार्ड क्र.2. सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला, गोरे, शारदानगर, आमगाव/खुर्द, सिंगलटोली, न्यू पोलीस कॉलनी. देवरी तालुक्यातील भागी,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक 5,7,9,10,15,16 व 17. सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हलबीटोला,डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.14 व 17, सौंदड येथील गांधी वार्ड, कोहळीटोला,रेंगेपार,खाडीपार व मडीटोला.आमगाव तालुक्यातील किंडगीपार, तिगाव, चिरचाळबांध, बनगाव, डोंगरगाव, पदमपूर-1 पदमपूर-2, रिसामा, कुंभारटोली, शिवनटोली, रिसामा-2, आमगाव शहरातील भवभूती वार्ड, फ्रेन्ड्स कॉलनी वार्ड क्र.3 व 4  चा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बिरसी 1 व 2, वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा, वडेगाव-2,गोंडमोहाडी,पाटीलटोला, खडकी, काचेवानी, मेंढा, मलपुरी, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी बाजार चौक, घोघरा, सरांडी, घोघरा-2, वडेगाव-2,मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, खोलगाव, सालेबर्डी, खैरलांजी, न्यू बेलाटी/खुर्द, बेलाटी/खुर्द-2, मुंडीकोटा बाजार चौक, सरांडी-2, सर्रा, कवलेवाडा, बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, नेहरू वार्ड, महात्मा गांधी वार्ड, लक्ष्मी वार्ड, रविदास वार्ड, शाहिद मिश्रा वार्ड, महात्मा फुले वार्ड, लक्ष्मीनगर,  महात्मा गांधी वार्ड, प्रगतीनगर, किल्ला वार्ड, मुस्लीम टोली आदीचा समावेश आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, पिंडकेपार, तेढा व तुमखेडा आदींचा समावेश आहे.

blank