29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हाधिकारी प्रदिपचंदनचे स्थानांतरण संदिप कदम नवे जिल्हाधिकारी

भंडारा जिल्हाधिकारी प्रदिपचंदनचे स्थानांतरण संदिप कदम नवे जिल्हाधिकारी

0
617

blank

गोंदिया,दि.17ः-राज्यसरकारने आज सात वरिष्ठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून भंडाराचे जिल्हाधिकारी एम.प्रदिपचंद्रन यांच्या जागेवर संदिप कदम यांची नियुक्ती केली आहे.मात्र प्रदिचंद्रन यांना नियुक्तीशिवाय ठेवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सह व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव पदी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते.एस.ए.तागडे यांची नियुक्ती प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष विभाग मंत्रालय मुंबई या पदावर करण्यात आली आहे.पराग जैन यांची नियुक्ती सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय मुंबई,डॉ.राजेश देशमुख यांची नियुक्ती जिल्हाधिकारी पुणे या रिक्त पदावर तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक हाफकिन औषध निर्माण महामंडळ मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

blank