43.5 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

शेखर धोटे यांचा राजीनामा एकमताने मंजूर

0
20

चंद्रपूर दि. २२: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. २७ संचालकांपैकी एकमेव संदीप गड्डमवार या बैठकीला अनुपस्थित होते. उपस्थित सर्व संचालकांनी धोटे यांच्या राजीनाम्याला स्विकृती दिली.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात दुपारी १२.३० वाजता ही बैठक सुरू झाली. विषयपत्रिकेवर केवळ राजीनामा स्वीकृतीचा एकमेव विषय होता. केवळ अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अध्यक्ष शेखर धोटे यांच्यासह उपाध्यक्ष प्रभा वासाडे यांच्याही राजिनाम्याला एकमताने मंजुरी मिळाली.

गेल्या १६ जुलैला या विषयावरील चर्चेसाठी संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र कोरमअभावी ती तहकूब करून २१ जुलैला घेण्यात आली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चित्तरंजन नाईक यांच्याकडे प्रशासकीय अधिकार आले असून पुढील निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडेच कामकाज राहणार आहे. बैठकीत मंजूर करण्यात आलेले दोन्ही राजीनामे सहकार खाते प्रधिकरणाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणुकीची पुढील तारीख ठरविली जाणार आहे. यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

blank