मुख्यामंत्र्यांविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग

0
6

मुंबई, दि. २२ – शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्दयावर विधानसभेत भाषण देत असताना माणिकराव ठाकरेंवर टीका केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे माझे चारित्र्यहनन झाल्याने त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दिल्याची माहिती काँग्रेस आमदार माणिकराव ठाकरे यांनी दिली.
कर्जमाफीच्या प्रश्नावर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार भाषण केले होते. या दरम्यान त्यांनी विरोधी पक्षांवर चांगलीच टीका केली. यवतमाळमधील सूतगिरणीवरुन मुख्यमंत्र्यांनी माणिकराव ठाकरेंवर निशाणा साधला होता. सूतगिरणी चालवण्यासाठी कोट्यावधी रुपये दिले पण अजूनही ती सुरु झाली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला होता. ही सूतगिरणी माणिकराव ठाकरेंशी संबंधीत होती. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात माणिकराव ठाकरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे.