42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ अतिवृष्टीमुळे फळ व भाजीपाला पिकांचे ४० लाखाचे नुकसान

अतिवृष्टीमुळे फळ व भाजीपाला पिकांचे ४० लाखाचे नुकसान

0
130

blank

सडक अर्जुनी(भामा चुर्हे),दि.24ः गेल्या 15 दिवसात तालुक्यात ८,९,20 व21 आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे बागायती शेती करणाऱ्या नदीकाठावरील शेतकऱ्यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील सौंदड मंडळात 21 आॅगस्टला रात्री झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे येथील हायवे लगतच्या तलावाच्या रपटा फुटल्याने तलावातील पाणी शेतकऱ्यांच्या बागायती शेतात शिरल्याने ४ ते ६ फुटापर्यंत पाणी साचले.त्यामुळे शेतात लावलेले पिक वाहून गेले.तसेच अंदाजे 15 लाखाचे मासे वाहुन गेले.सिंदीपार व सौंदड येथील विठ्ठले व कापगते तसेच नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले.सिंदीपार येथील शेतकरी कापगते यांच्या नदी बाजूला असलेल्या सात एकर फळबागेमध्ये दिड एकर शेतीत टरबुज,एक एकर मध्ये कारले,एक एकरमध्ये काकडी,एक एकर मध्ये चवळी, साडेतीन एकरमध्ये कोहळा लावला होता. आतापर्यंत या शेतकऱ्याचे साडे चार लाख रुपये खर्च झाले होते.या फळबागेतुन या शेतकऱ्याला १५ ते २० लाखाचे उत्पन्न झाले असते.परंतु झालेल्या अतिवृष्टीत ढगफुटी पाऊसामुळे डोळ्यासमोर हाती आलेले पिक नदीच्या पुरामुळे वाहुन गेले.शेतकरी चोपराम गोविंदा कापगते यांनी सांगितले की,२४ फेब्रुवारी लाभ दिवसाढवळ्या चार वाजे आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने तीन एकरात लावलेला टरबुज नेस्तनाबूत केले.त्याच जागेवर मार्च महिन्यात खरबुजाची लागवड केली.आणि एप्रिलमध्ये निघालेला खरबुज(डांगरु) कोरोना विषाणू संसर्ग बचावासाठी लॉकडाऊन मुळे खरबुज शेतातच सडला.यामध्ये ४० टन खरबुजाचे उत्पन्न झाले असते.या शेतकऱ्यांचे ३०ते ३५ लाखाचे उत्पन्न बुडाले.आजघडीला शेतकऱ्यांचे फळबागेतील भाजीपाल्याला भाव मिळत नाही. पडल्या भावात ८ ते १०रूपये प्रती किलो दराने भेंडी विक्री करावी लागते. 21 आॅगस्ट ला आलेल्या अतिवृष्टीमुळे चुलबंद नदीला आलेल्या महापुराने सात एकर शेतीमध्ये लावलेले पीक उध्वस्त झाले.तीन वेळा हाती आलेले पीक उध्वस्त झाल्याने गारपीट,कोरोना महामारी , अतिवृष्टीआणि लाॅकडाऊनमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकरी विक्रीसाठी बाजारपेठेत नेऊ शकले नाही.तालुक्यातील मुरपार,लेंडेझरी,चिचटोला,मुंडिपार,सितेपार,मालीजुंगा,घटेगाव,सिंदीबिर्री,घाटबोरी,या परिसरातील शेतकऱ्यांचे लाॅकडाऊनच्या कालावधीत मोठे नुकसान झाले.तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांचे वाली कोण ?पूर्व विदर्भातील फळबाग शेतकऱ्यांना शासनाकडून अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांचे नुकसान भरपाई मिळत नाही.आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाते.शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना एकसारखा मोबदला द्यायला पाहिजे,पण तसे होत नाही. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.

blank