23 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News प्रख्यात गायिका वसुंधरा कोमकली निर्वतल्या

प्रख्यात गायिका वसुंधरा कोमकली निर्वतल्या

0
34

देवास (मध्य प्रदेश) – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि पद्मश्री पंडित कुमार गंधर्व यांच्या पत्नी पद्मश्री वसुंधरा कोमकली यांचे मध्य प्रदेशातील देवास येथे बुधवारी निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या.
माता टेकरी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले असून त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत जगतावर शोककळा पसरली आहे.
जमशेदपूर येथे जन्मलेल्या वसुंधरा कोमकली या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. १९४२ मध्ये त्यांनी आधी कलकत्ता आणि तिथून कुमार गंधर्व आणि प्रोफेसर बी. आर. देवधर यांच्याकडून संगीताचे धडे गिरवण्यासाठी मुंबई गाठली. त्यानंतर कुमार गंधर्व यांच्याशीच विवाह करून त्या देवास येथे स्थायिक झाल्या.

blank