गुन्हेवार्ता Archives - Berar Times

तांदळाने भरलेला ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ जण अटक, इतर फरार आरोपींचा शोध सुरू
गोंदिया,:रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाला ओलीस ठेवून ३० टनांपेक्षा जास्त तांदळाने भरलेला ट्रक लुटण्याच्या खळबळजनक घटनेचा गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून लुटलेला ट्रक आणि सुमारे ३० टन १०७ किलो तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १८ लाख रुपये सांगण्यात आली असून, फरार झालेल्या इतर आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असलेले ट्रक चालक नवीन श्रीरामचन्द्र मौर्या (वय ३५) हे १५ जुलै २०२६ रोजी मध्य प्रदेशातील चाकघाट भागातून सुमारे ३० टन ७६५ किलो तांदूळ घेऊन दिल्लीसाठी निघाले होते. १६ जुलैच्या रात्री १२ वाजेच्या सुमारास ट्रक रावणवाडी परिसरात पोहोचला. त्याच वेळी चार अनोळखी बदमाशांनी रस्ता अडवून चालकाकडे आधी पाणी मागितले आणि नंतर त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी चालकाचे हात-पाय बांधून त्याला ओलीस ठेवले आणि तांदळासह ट्रक लुटून पसार झाले.

या घटनेनंतर चालकाच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, लुटलेला ट्रक आणि तांदूळ गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोहका गावात लपवून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने जाळे रचून संजय राजकुमार दमाहे (वय २०, रा. कोहका, जि. गोंदिया) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने ट्रक लुटल्याची आणि तांदूळ वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याची कबुली दिली. आरोपीच्या माहितीवरून पोलिसांनी विविध ठिकाणांवरून एकूण ३० टन १०७ किलो तांदूळ जप्त केला, तसेच लुटलेला ट्रकही ताब्यात घेतला. जप्त केलेल्या तांदळाची किंमत सुमारे ८ लाख १३ हजार ६९९ रुपये आणि ट्रकची किंमत सुमारे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रावणवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. तर या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके सतत छापे टाकत आहेत.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक गौरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

The post तांदळाने भरलेला ट्रक लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १ जण अटक, इतर फरार आरोपींचा शोध सुरू appeared first on Berar Times.

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी
जालना- जिल्ह्यातील जामखेड परिसरात आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनचालक, अंगरक्षक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या वेळी आमदार नारायण कुचे वाहनात नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार जामखेडहून पंढरपूर (Pandharpur) येथे जात होती. प्रवासादरम्यान अचानक रस्त्यावर कुत्रा आल्याने चालकाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याखाली जाऊन पलटी झाली. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की वाहनाने अनेक पलट्या घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दुर्घटनेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने जालन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातात आमदार नारायण कुचे यांचे अंगरक्षक, वाहनचालक आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार कुचे यांचे समर्थक आणि स्थानिक पदाधिकारी रुग्णालयात दाखल झाले.

The post आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात; ३ जण गंभीर जखमी appeared first on Berar Times.

तिरोड़ा नगरपरिषद अध्यक्षांसह खासगी व्यक्तीवर एसीबीचा गुन्हा
*२५ लाखांच्या बिलापोटी ३.२० लाखांची लाच मागितली; एसीबीने केला सापळा_

गोंदिया : तिरोड़ा नगर परिषदेचे अध्यक्ष *अशोक रामजीबाबू असाटी* आणि खासगी व्यक्ती *कैलाश किशन वाघमारे* यांच्याविरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपाखाली एसीबी गोंदियाने गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध तिरोड़ा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*प्रकरण काय आहे?*

जानकारीनुसार, ६० वर्षीय तक्रारदार यांचा डेकोरेशन व केटरिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी वर्ष २०२५ मध्ये तिरोड़ा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान डेकोरेशन आणि केटरिंगच्या सेवा दिल्या होत्या. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी २५ लाख २ हजार रुपयांचे बिल नगर परिषदेत सादर केले होते.

तक्रारीनुसार, २० मे २०२६ रोजी बिलाच्या पेमेंटसाठी नगराध्यक्ष अशोक असाटी यांची भेट घेतली असता त्यांनी कथितपणे सांगितले की, “१६ लाख रुपयांपर्यंतचे बिल मंजूर होऊ शकते, परंतु त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतील.”

दुसऱ्या दिवशी झालेल्या भेटीत नगराध्यक्षांनी तक्रारदाराच्या हातावर *३ लाख २० हजार* रुपये लिहून तितकी रक्कम देण्याची मागणी केली. तक्रारदार लाच देण्यास तयार नसल्याने त्यांनी ८ जून २०२६ रोजी एसीबी गोंदिया कार्यालयात तक्रार दाखल केली.

*एसीबीचा सापळा*

तक्रारीच्या आधारे एसीबीने पंचांच्या उपस्थितीत मागणीची पडताळणी केली. तपासादरम्यान नगराध्यक्षांनी ६ लाख रुपयांचा चेक जारी करण्याच्या बदल्यात *१ लाख २० हजार* रुपयांची लाच मागितली आणि ती रक्कम आपल्या पीए *शुभम भोयर* यांना देण्यास सांगितल्याचा आरोप आहे. तसेच उर्वरित १० लाखांचे पेमेंट झाल्यानंतर पुढेही रक्कम मागितली.

त्यानंतर ९ जून २०२६ रोजी एसीबीने सापळा लावला. तक्रारदार रकमेसह आरोपीच्या कार्यालयात पोहोचले, मात्र आरोपींना संशय आल्याने कथितपणे लाचेची रक्कम स्वीकारली गेली नाही. परंतु मागणीची पडताळणी झाल्याने एसीबीने कायदेशीर कारवाई करत १८ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.

*सध्या काय स्थिती?*

एसीबीने सांगितले की, आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस देण्यात आली असून त्यांच्या घरांची झडती सुरू आहे. ही कारवाई *पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी* यांच्या नेतृत्वाखाली झाली असून तपास *पोलीस निरीक्षक उमाकांत उगले* करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी गोंदियाच्या टीमने ही कारवाई केली.

The post तिरोड़ा नगरपरिषद अध्यक्षांसह खासगी व्यक्तीवर एसीबीचा गुन्हा appeared first on Berar Times.

ट्रक लुटणारी टोळी सक्रिय: चालकाला बंधक बनवून तांदळाने भरलेला ट्रक पळवला; ४ अज्ञात आरोपींचा शोध सुरू
गोंदिया:जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (१७ जुलै) रात्री एक खळबळजनक लुटीची घटना समोर आली आहे. अज्ञात बदमाशांनी ट्रक चालकावर जीवघेणा हल्ला करून त्याला बंधक बनवले आणि तब्बल ३० टन ७६५ किलो तांदळाने भरलेला टाटा कंपनीचा ट्रक घेऊन पळ काढला. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

घटना नेमकी काय घडली?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार ट्रक चालक नवीन श्रीरामचंद्र मौर्य (वय ३५ वर्षे, रा. हनुमानगंज, कतवारपुर, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) हा मध्य प्रदेशातील चाकघाट येथून तांदूळ भरून सडक अर्जुनीच्या दिशेने जात होता.१७ जुलै २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सावरी बस स्टॉपजवळ हा प्रकार घडला.चालक मौर्य हा सावरी बस स्टॉपजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून विश्रांती घेत होता. दरम्यान, एक अज्ञात इसम ट्रकजवळ आला आणि त्याने पाणी मागितले. चालकाने त्याला पाण्याची बाटली दिली आणि तो मोबाईल पाहत बसला. त्याच वेळी आरोपीने अचानक चाकू काढून ट्रकच्या खिडकीवर वार केला. यात चालकाच्या हाताच्या दोन बोटांना आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.

चालकाला बेदम मारहाण करून केले बंधक

पहिल्या आरोपीने हल्ला करताच त्याच्या दुसऱ्या साथीदाराने ट्रकचा दुसरा दरवाजा जबरदस्तीने उघडून केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांनी चालकाला ट्रकमधून खाली ढकलून दिले, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्याच वेळी त्यांचे इतर दोन साथीदारही तिथे पोहोचले. चारही आरोपींनी चालकाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याचे हात-पाय बांधून त्याला बंधक बनवले आणि ३० टन ५७५ किलो तांदळासह टाटा कंपनीचा ट्रक घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलीस तपासाला गती

घटनेनंतर जखमी चालकाने कसाबसा रावणवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी चालकाच्या वैद्यकीय अहवालाच्या आणि तक्रारीच्या आधारे अपराध क्रमांक ३७१/२०२६ अंतर्गत बीएनएसच्या कलम ३०९(4), ११८(1), ३५२, ३५१(2) आणि ३(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.रावणवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पीआय शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आरोपींचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीची मदत घेतली जात असून, पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

The post ट्रक लुटणारी टोळी सक्रिय: चालकाला बंधक बनवून तांदळाने भरलेला ट्रक पळवला; ४ अज्ञात आरोपींचा शोध सुरू appeared first on Berar Times.

पिकअपमधून साडेआठ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त
सालेकसा : तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनातून १० मोठे पोते सुगंधी तंबाखूचा साठा सालेकसा पोलिसांनी जप्त केला. जप्त केलेल्या एकूण मालाची किमत ८ लाख ५० हजार रुपये आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) करण्यात आली.

सालेकसा पोलिसांनी गस्तीदरम्यान तालुक्यातील रोंढा नाल्याजवळ एक पांढऱ्या रंगाच्या पिकअपमधून (क्र. एमएच ३५ एजे१०४२) ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० मोठ्या पांढऱ्या रंगाचे पोत्यांमध्ये प्रत्येकी ५० नग आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट, १० मोठ्या पोत्यांमध्ये २००० नग, आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत दोन लाख रुपये व पाच मोठ्या

फिकट पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये ५० नग एम. डी ७ सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट प्रत्येकी किमती १०० रुपये याप्रमाणे एकूण पाच मोठ्या पोत्यांमध्ये एक हजार नग आर. के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखूचे पॅकेट किमत एक लाख रुपये असा एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पिकअप वाहनचालक महेश

सुशील नेवारे (वय ४१ वर्षे, रा. बहेला ता. लांजी जि. बालाघाट (म.प्र) व जगदीश लहुलाल भोयर (वय ३८ वर्षे, रा. अंधियाटोला ता. लांजी जि. बालाघाट) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवि नागोसे यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार तूरकर, पो.ना. कान्सकर, पो.शि. वेदक व बैस यांनी केली

The post पिकअपमधून साडेआठ लाखांचा सुगंधित तंबाखूचा साठा जप्त appeared first on Berar Times.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वापर करून देशभर सायबर डल्ला; तिरोडा पोलीस ‘ॲक्शन मोड’वर!
तामिळनाडू, गुजरात, दिल्ली अन् हिमाचल प्रदेशात सायबर फसवणुकीचे ४ गुन्हे दाखल

खात्यात अवघ्या दोन दिवसांत जमा झाले ९४ हजार रुपये; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

गोंदिया दि. १८ जुलै:गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन सायबर फसवणूक आणि आर्थिक फसवणुकीचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCRP) वर प्राप्त झालेल्या तक्रारी आणि एका संशयास्पद बँक खात्याच्या विश्लेषणावरून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिरोडा पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६१(२), ३१८(४) आणि जुन्या भादंविच्या कलम १२०(ब), ४२० सह संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा क्रमांक ६८१/२०२६ नोंदवून तपासाची चक्रे वेगवान फिरवली आहेत.

असे उघड झाले ‘बँक खाते’ कनेक्शन:

तिरोडा पोलिसांकडून सायबर गुन्ह्यांचा आढावा घेतला जात असताना, एनसीआरपी पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या खाते क्रमांक ६०५५४१३३००१ चा वापर संशयास्पद व्यवहारांसाठी केला गेल्याचे आढळून आले. तपासात समोर आले की, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या ऑनलाइन फसवणुकीची रक्कम आधी या खात्यात जमा केली जायची आणि त्यानंतर ती इतर विविध खात्यांमध्ये वळवली जायची.प्राथमिक तपासाअंती, २३ ते २४ नोव्हेंबर २०२५ या अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत या बँक खात्यात ९४ हजार रुपयांची संशयास्पद रक्कम जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरातील ‘या’ ४ राज्यांमध्ये गुन्हे दाखल:

एनसीआरपी पोर्टलवरील नोंदीनुसार, या एकाच बँक खात्याविरुद्ध देशातील वेगवेगळ्या राज्यांतून एकूण ४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत:

राज्य / पोलीस ठाणे

फसवणुकीची रक्कम

तामिळनाडू (पहिली तक्रार)

₹ ३०,०००/-

दिल्ली (स्पेशल सेल सायबर पोलीस स्टेशन)

₹ २५,०००/-

गुजरात (वडोदरा सिटी सायबर क्राईम पोलीस ठाणे)

₹ २६,०००/-

हिमाचल प्रदेश (बिलासपुर येथील झंडुता पोलीस ठाणे)

₹ १३,०००/-

एकूण सायबर ठगी

₹ ९४,०००/-

पोलीस यंत्रणा सतर्क, नेटवर्कचा शोध सुरू:

या संपूर्ण प्रकरणाची रीतसर तक्रार पोलीस शिपाई धनंजय प्रभू बरई यांनी नोंदवली आहे. या हायप्रोफाइल सायबर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक प्रियांका बैस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तिरोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या आंतरराज्य सायबर गुन्हेगारीच्या संपूर्ण नेटवर्कचा कसून शोध घेत असून, संबंधित बँक खात्यांचे बँक स्टेटमेंट आणि इतर व्यवहारांची बारकाईने पडताळणी केली जात आहे.

The post बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचा वापर करून देशभर सायबर डल्ला; तिरोडा पोलीस ‘ॲक्शन मोड’वर! appeared first on Berar Times.

बिरसी फाटा चौकात भरधाव ट्रक दुकानात घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली
चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील बिरसी फाटा चौक येथे शुक्रवारी दुपारी एक भरधाव ट्रक थेट दुकानात घुसल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 49 सीडी 4737 क्रमांकाचा ट्रक नियंत्रण सुटल्याने फागू राघोरते यांच्या दुकानात घुसला. अपघाताच्या वेळी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेत दुकानातील साहित्याचे नुकसान झाले असून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटनेची नोंद पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

The post बिरसी फाटा चौकात भरधाव ट्रक दुकानात घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली appeared first on Berar Times.

कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा
नागपूर : कपडे बदलत असताना अल्पवयीन मुलीचा व्हिडिओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर तब्बल दीड वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश प्रेमदास मालखेडे (वय ३८, रा. मेंढला, नरखेड) असे आरोपीचे नाव आहे. तो हुडकेश्वरमधील जानकीनगर परिसरात युनियन बँकेमागे वास्तव्यास होता.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी बचतगट चालवत होती. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने या बचतगटामार्फत कर्ज घेतल्यामुळे दोन्ही कुटुंबांची ओळख झाली. बचतगटाच्या कलेक्शनची रक्कम जमा करण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेहमी आरोपीच्या घरी जात होती.

काही दिवसांपूर्वी आरोपीची पत्नी आजारी पडल्याने पीडित मुलगी व तिच्या आईने रुग्णालयात तिची देखभाल केली होती. त्यानंतर घरातील कामांसाठीही अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी अनेकदा ये-जा करत होती.पोलिसांच्या माहितीनुसार, याच काळात मुलगी कपडे बदलत असताना आरोपीने तिचा व्हिडिओ चित्रीत केला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. व्हिडिओची भीती दाखवून तो अल्पवयीन मुलीला वारंवार आपल्या घरी बोलावत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने तिच्यावर सातत्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आपल्या आईकडे संपूर्ण आपबीती कथन केली. त्यानंतर कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.

The post कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा appeared first on Berar Times.

विहिरीत वाघाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी शेतकरी ताब्यात
गोंदिया, दि. 15 जुलै : गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील शेतातील विहिरीत पद्देदार वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याप्रकरणी वन विभागाने एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोशन लालचंद कटरे (वय 53, रा. मुरदोली, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) यांच्या शेतातील विहिरीत 11 जुलै रोजी सायंकाळी पद्देदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. या घटनेच्या अनुषंगाने वन विभागाने त्यांना आज ता. 15 जुलै रोजी ताब्यात घेतले असून वैद्यकीय तपासणीनंतर सडक अर्जुनी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच वन विभागाकडून वन कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत कलम 9, 39 व 51 अन्वये 12 जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित व्यक्तीविरुद्ध 2024 मध्ये रानगव्याच्या मृत्यूप्रकरणीही वन गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी विद्युत तारेचा शॉक लागून रानगव्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तसेच मृत रानगवा खड्डा खोदून जमिनीत पुरल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर संशयित म्हणून वन विभागाने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे.वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर. जी. बेहरे, अतिरिक्त कार्यभार, सडक अर्जुनी, हे करीत आहेत.

The post विहिरीत वाघाचा मृतदेह आढळल्याप्रकरणी शेतकरी ताब्यात appeared first on Berar Times.

बोलेरो पिकअपच्या धडकेत ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू
गोंदिया,दि.१५ः वडीलांसोबत बाजारात जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप ट्रकची धडक बसल्याने एका तीन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे घडली.बालमटोला येथील रहिवासी लक्ष्मीचंद सेवाईवार आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह दासगाव येथे बाजाराला जात असताना अचानक, एका अज्ञात आणि भरधाव बोलेरो पिकअप ट्रकने त्या मुलीला जोरदार धडक देत वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.घटनेनंतर वडील आणि ग्रामस्थांच्या मदतीने तिला तातडीने दासगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबाने रावणवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. अत्यंत व्यथित झालेल्या वडिलांनी मुलीचा मृतदेह रुग्णालयातून पुन्हा अपघातस्थळी आणला आणि रस्त्यावर बसून पोलिसांविरुद्ध घोषणा देत न्यायाची मागणी केली. अखेरीस रावणवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी (SHO) त्यांची भेट घेतली आणि चालकाला अटक करून वाहन जप्त करण्याची लेखी मागणी कुटुंबाने त्यांच्याकडे केली. त्यानंतर, शवविच्छेदनासाठी पोलिसांच्या वाहनातून मृतदेह गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; ही संपूर्ण प्रक्रिया रात्री ९:०० ते पहाटे ३:०० या वेळेत पार पडली. दरम्यान, ग्रामस्थांनी बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांवर बंदी घालण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.तसेच, रस्त्यावर यापूर्वी बसवलेले ‘स्पीड ब्रेकर’ अज्ञात व्यक्तींनी काढून टाकले होते आणि जर ते स्पीड ब्रेकर जागेवर असते तर कदाचित हा अपघात टाळता आला असता, असेही त्यांनी नमूद केले.

The post बोलेरो पिकअपच्या धडकेत ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू appeared first on Berar Times.