देश Archives - Berar Times

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. रविवारी सकाळपासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder Price) दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी (LPG) सिलेंडरचा भाव 29 रुपयांनी वाढला आहे. यामुळे ‘कॉमन मॅन’च्या घरातील किचन बजेट कोलमडणार आहे. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, आता दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर भागांतही 29 रुपयांचीच वाढ झाली आहे. (LPG Gas Rate)

घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर 912.50 रुपयांवरुन 941.50 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी 7 मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता 29 रुपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस अगोदरच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे 703 रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या (Commercial LPG rate) दरात वाढ केली होती. 1 जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 42 रुपयांनी वाढला होता. गेल्या पाच महिन्यात 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 19 किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढत आहेत. पेट्रोल-़डिझेल, गॅस व अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

The post घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ appeared first on Berar Times.

के. अण्णामलाई भाजपमधून बाहेर पडले, केली राजकीय पक्षाची घोषणा
नवी दिल्ली : तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी भाजपमधील सर्व पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मंजूर केला आहे. >भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्ष मुख्यालयाचे प्रमुख अरुण सिंह यांनी प्रसिद्धीपत्रक काढून राजीनामा मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या के. अण्णामलाई यांनी काही तासांतच स्वतःच्या पक्षाची घोषणा केली आहे. आता त्यांना किती जणांची आणि कशी साथ मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.के. अण्णामलाई हे काही काळ तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. पण अण्णाद्रमुकसोबत निवडणूकपूर्व युतीची चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते पक्षात एक नेते म्हणून सक्रीय होते. दक्षिणेतले भाजपचे प्रभावी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. पण तामिळनाडूत सी. विजय जोसेफच्या नेतृत्वात टीव्हीके पक्षाने सरकार स्थापन केले. यानंतर काही दिवसांतच के. अण्णामलाई यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पक्षाची घोषणा केली आहे.आजच (शुक्रवार ५ जून २०२६) दुपारी के. अण्णामलाई पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने राजीनामा मंजूर केल्यानंतर के. अण्णामलाई यांनी एक व्हिडीओ पब्लिश केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपण स्थापन करत असलेला पक्ष पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.दक्षिणेतले सिंघम म्हणून ओळखले जाणारे कुप्पुसामी अण्णामलाई अर्थात के. अण्णामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा राजकारणातील वैयक्तिक चाहता वर्ग मोठा आहे. या चाहत्यांचा आणि समर्थकांचा त्यांना पुढील राजकीय वाटचालीत फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सध्या तामिळनाडूच्या विधानसभेत २३४ पैकी एक आमदार भाजपचा आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपचे विधानसभेत चार आमदार होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांच्या संख्येत घट झाली. हा निकाल जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांतच के. अण्णामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.

The post के. अण्णामलाई भाजपमधून बाहेर पडले, केली राजकीय पक्षाची घोषणा appeared first on Berar Times.

महाराष्ट्राची विक्रमी झेप;सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा
देशातील एकूण सौर पंपांमध्ये महाराष्ट्राचा 64 टक्के वाटा

नागपूर, 5 जून 2026: सौर कृषिपंपामध्ये विश्वविक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने बुधवारी (दि. 3) देशात सर्वाधिक 10 लाख सौर कृषिपंपांचा टप्पा पूर्ण केला आणि देशपातळीवर एक नवा इतिहास रचला आहे. पीएम कुसुम-बी व मागेल त्याला सौर कृषिपंप अंतर्गत महाराष्ट्राने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशातील एकूण सौर कृषिपंपांपैकी तब्बल 64 टक्के सौर पंप एकट्या महाराष्ट्रात कार्यान्वित झाले आहेत. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या अभिमानास्पद कामगिरीमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

प्रधानमंत्री कुसुम-बी आणि राज्य शासनाच्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात महावितरणने सौर कृषिपंपामध्ये मोठी आघाडी घेतली आहे.

देशात आतापर्यंत एकूण 15 लाख 62 हजार 289 सौर कृषिपंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल 10 लाख 472 (64 टक्के) एकट्या महाराष्ट्रात तर उर्वरित सर्व राज्यांमध्ये एकूण 5 लाख 61 हजार 817 (34 टक्के) कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत. महाराष्ट्रानंतर हरियाणा- 1 लाख 90 हजार, राजस्थान- 1 लाख 27 हजार, उत्तरप्रदेश- 71 हजार 538, झारखंड- 61 हजार 452, गुजरात- 21 हजार 894 अशी क्रमवारी आहे. याआधी महाराष्ट्राने महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत एकाच महिन्यात तब्बल 45 हजार 911 सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याची विश्वविक्रमी कामगिरी केली आहे. त्याची नोंद डिसेंबर 2025 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के आणि अनुसूचित जाती-जमाती शेतकऱ्यांसाठी केवळ 5 टक्के लाभार्थी हिस्स्यावर तीन, पाच व 7.5 अश्वशक्तीचे सौर कृषिपंप देण्यात येत आहेत. सौरपंपाच्या पॅनेल्समधून 25 वर्षे वीज निर्मिती होते. त्यामुळे आतापर्यंत 10 लाखांवर शेतकऱ्यांची वीजबिलांमधून मुक्तता झाली आहे. तर दिवसा अखंडित वीजपुरवठा मिळत आहे. यासोबतच शेतातील विद्युत अपघातांचा धोकाही पूर्णतः टळला आहे. या सौर पॅनेल्समुळे सिंचनासह शेत घरातील विविध उपकरणे, मोबाईल चार्जिंग व ई-वाहन चार्जिंग करणेही सहज शक्य झाले आहे. तसेच शिल्लक विजेच्या आधारे शेतकऱ्यांना छोटे कृषिपुरक अन्य व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.

या योजनेतील प्रत्येक सौरपंपाला 5 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार एजन्सीवर बंधनकारक आहे. तसेच सोलर पॅनेल्स आणि पंपाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती तसेच चोरीविरोधी विमा संरक्षणही उपलब्ध आहे. सौर कृषिपंपाबाबत काही तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांना महावितरण मोबाईल अॅप व वेबसाईट, 24 तास सुरु राहणारे टोल फ्री क्रमांक आणि संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करण्याची सोय उपलब्ध आहे.

The post महाराष्ट्राची विक्रमी झेप;सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा appeared first on Berar Times.

निवासी आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती सिंघल यांनी स्विकारला
नवी दिल्ली- महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी आज श्रीमती आर. विमला यांच्याकडून निवासी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी विशेष आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सिंघल यांची निवासी आयुक्त व सचिव म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.श्रीमती सिंघल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2009 च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव, सातारा जिल्हाधिकारी आदी पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

The post निवासी आयुक्त पदाचा कार्यभार श्रीमती सिंघल यांनी स्विकारला appeared first on Berar Times.

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा

नवी दिल्ली, दि. २७ : केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी  तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज याबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

सीजीओ कॉम्प्लेक्समधील पंडित दीनदयाळ अंत्योदय भवन येथे आयोजित या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,  केंद्र सरकारच्या जलसंपदा विभागाचे सचिव व्ही. एल. कांथाराव, पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव अशोक के. के. मीना,  केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अनुपम प्रसाद, नॅशनल वॉटर मिशनच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव लोकेश चंद्रा, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,  ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव नवीन सोना,  मुख्यमंत्र्यांचे सल्लागार श्रीराम वेदिरे , जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे आदी यावेळी उपस्थित होते.

​प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंर्गंत राज्यात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जादा निधीची मागणी करण्यात आली. त्यास केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जलजीवन मिशनमधील उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. राज्यातील ७५% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना, तसेच ५०% ते ७५% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. या पाईपलाईन आणि पाणी पायाभूत सुविधांच्या योजनांना गती देऊन त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून अंदाजे ६,८०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

​ पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे स्थानिक गावे, ग्रामपंचायती, तालुके आणि जिल्हा पातळीवर अचूक प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.राज्य आणि केंद्र अधिकाऱ्यांनी ९०% योजनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सद्यस्थितीत आढळून आलेल्या त्रुटी दूर केल्या जात आहेत, जलस्रोतांचे बळकटीकरण केले जात आहे आणि पुढील कामे दर्जेदार होतील याची कडक खबरदारी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जल जीवन मिशन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत महत्त्वाकांक्षी स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करेल. केंद्र सरकारकडून अधिकाधिक सहकार्य अपेक्षित असून त्यानंतर  प्रलंबित बाबी मार्गी लावून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात देशातील सुमारे ४० टक्के धरणे असूनही राज्यातील जवळपास ५० टक्के भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यावर जलसंधारण आणि लोकसहभाग हाच दीर्घकालीन उपाय आहे. ‘जलतारा’सारख्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात येणार असून सीएसआर आणि मनरेगा निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राबवली जातील.​  जलताराचे स्ट्रक्चर्स वाढवण्यावर भर देण्यास सांगितले आहे. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून आधीच काम सुरू असून, कन्व्हर्जन्स करून हे काम निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पांमध्ये राज्यांमध्ये सहमती होण्यास वेळ लागतो, असे  प्रधानमंत्र्यांचे मत असल्याने राज्यांतर्गत असलेल्या नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.राष्ट्रीय जल आयोगाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकारकडून या प्रकल्पांच्या निधी वाटपासंदर्भात पुढील सकारात्मक चर्चा होईल, असे या बैठकीत सांगण्यात आले. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भाग्य बदलू शकते, अशी खात्री व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राकडे पाणी वळविण्याचे प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्यातील सध्याचा ५२ टक्के दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त होऊ शकतो. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून दरवर्षी समुद्रात जाणाऱ्या १०० टीएमसी पाण्यापैकी ६२ टीएमसी पाणी वळविण्याचे नियोजन आहे. तसेच उल्हास खोऱ्यामधील ३५० टीएमसी पाण्यापैकी ७५ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याची योजना आहे.या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व अभ्यास आणि अहवाल पूर्ण झाले असून केंद्रीय जल आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करता येईल. या मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाचाही उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारदरम्यान या संदर्भात करार झाला असून भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरू शकतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आढाव्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी जलसंधारण आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलक्रांती घडवून आणण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, नागपूर आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पारंपरिक धरणे आणि कालव्यांसोबतच ‘जलसंचय आणि जनभागीदारी’वर आधारित जलसंधारण मॉडेल अधिक प्रभावी ठरत आहे.

त्यांनी महाराष्ट्रातील  ‘जलतारा’ योजनेचे विशेष कौतुक करत सांगितले की, अवघ्या ४ ते ५ हजार रुपयांत उभारल्या जाणाऱ्या या छोट्या स्ट्रक्चरमुळे एका हंगामात एका एकरात ३ ते ४ लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात १ ते २ जलतारा स्ट्रक्चर उभारल्यास भूजल पातळीत तात्काळ सुधारणा दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.

श्री पाटील यांनी सांगितले की, सप्टेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या मोहिमेत ३१ मे २०२५ पर्यंत १० लाख स्ट्रक्चर्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात २७.५० लाख स्ट्रक्चर्स उभारण्यात आली. तसेच ३१ मे २०२६ पर्यंत १ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आजपर्यंत १ कोटी २६ लाख कामे पूर्ण झाली आहेत. ३१ मेपर्यंत हा आकडा १.५ कोटींवर नेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की, मनरेगा अंतर्गत डार्क झोन भागात ६५ टक्के निधी जलसंधारणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली असून सेमी-क्रिटिकल भागात ४० टक्के आणि इतर भागात ३० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात लोकसहभागातून ३० हजार स्ट्रक्चर्स उभारल्यानंतर भूजल पातळीत मोठी सुधारणा झाल्याचा अनुभव त्यांनी मांडला.

मुक्ताईनगर येथे सीएसआर फंडातून १२ कोटी रुपये खर्च करून जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यामुळे तीव्र पाणीटंचाई दूर झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘जल जीवन, जल संचय, जन भागीदारी’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना लोकचळवळीत रूपांतरित झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

हर घर जल योजनेमुळे देशातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पाणी आणण्यासाठी महिलांचा मोठा वेळ खर्च होत होता; मात्र आता घराघरांत स्वच्छ पाणी उपलब्ध होत असल्याने आरोग्य सुधारत असून आरोग्य खर्चातही मोठी बचत होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरापर्यंत अखंड पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

जी रामजी योजनेत जलसंधारणाच्या कामांना अधिक महत्त्व देण्याचा आग्रह राज्याकडून धरण्यात आला असून डार्क झोनमध्ये ( भूजल पातळी अत्यंत खालावलेले क्षेत्र ) असणाऱ्या गावांना 65 टक्के एवढा निधी तर सेमी डार्क झोनमधील गावांना 45 टक्के निधी तर उर्वरित गावांना 30 टक्के निधी मिळणार आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्याला मिळालेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.या योजनांसाठी आवश्यक असलेल्या अधिकच्या निधीची  मागणी करण्यात आली असून, त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

The post जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on Berar Times.

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, दि. २6: देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास  उपराष्ट्रपती सी. पी.  राधाकृष्णन , पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये  ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी व खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.

दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांचा समावेश आहे. त्यांनी एका छोट्या बिल डिस्काउंटिंग स्टार्टअपपासून देशातील अग्रगण्य खासगी बँक उभी करून भारतीय बँकिंग क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना  गौरविण्यात आले. जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पीयूष पांडे यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात जनार्दन बापुराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ग्रामीण महाराष्ट्रात जलसंधारण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेद्वारे अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.

रघुवीर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोककलेसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे पुत्र रघुवीर खेडकर असलेले यांनी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ जागतिक स्तरावर पोहोचवली असून लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यही त्यांनी केले आहे. श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. परभणीचे प्रयोगशील शेतकरी आणि भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या श्री. लाड यांनी ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित करून कापूस उत्पादन वाढीसाठी मोठे कार्य केले. ‘लाल कंधारी’ गाईंच्या संवर्धनासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

नागपूरस्थित उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्र आणि खाणकाम उद्योगात मोठे योगदान दिले आहे. डिफेन्स एक्सप्लोझिव्ह क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला चालना देणारे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे  प्रा. जुझर वासी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गोडबोले दाम्पत्याला संयुक्त पद्मश्री

मूळचे पुण्याचे असलेले डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला संयुक्तपणे ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली ३५ वर्षे त्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील बस्तर आणि अबू झमाडसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे कार्य केले आहे. ‘ट्रस्ट फॉर हेल्थ’च्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागातील कुपोषण आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष योगदान दिले असून, सुमारे एक लाख आदिवासींना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या छत्तीसगड राज्यामधील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

यंदाच्या पद्म पुरस्कार वितरण दोन टप्प्यांत होत असून, आजच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील ६६ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कार यादीत एकूण १३१ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण पुरस्कारार्थींमध्ये १९ महिला असून, १६ मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

The post महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान appeared first on Berar Times.

गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक
रांची,दि.२५ मे: रांची येथे पार पडलेल्या फेडरेशन कप अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय धावपटूंनी वेगाची नवी परिभाषाच लिहिली. पंजाबच्या गुरिंदरवीर सिंगने पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीत केवळ सुवर्णपदक जिंकले नाही, तर भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात अभूतपूर्व असा विक्रम नोंदवत देशातील सर्वात वेगवान धावपटू बनण्याचा मान पटकावला.

शनिवारी झालेल्या अंतिम फेरीत गुरिंदरवीरने १०.०९ सेकंदांची वादळी धाव घेत ‘१०.१० सेकंद’ ही भारतीय स्प्रिंटमधील ऐतिहासिक मर्यादा प्रथमच पार केली. याआधी भारतातील कोणत्याही धावपटूला हा टप्पा गाठता आला नव्हता. त्यामुळे रांचीच्या ट्रॅकवर भारतीय अॅथलेटिक्ससाठी एक नवे पर्व सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

या स्पर्धेत ओडिशाचा अनिमेश कुजूरनेही शानदार कामगिरी करत १०.२० सेकंदांची वेळ नोंदवली आणि रौप्यपदक पटकावले. तर प्रणव प्रमोदने १०.२९ सेकंदांसह तिसरे स्थान मिळवले.

विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत गुरिंदरवीर आणि अनिमेश यांच्यात राष्ट्रीय विक्रमासाठी अक्षरशः चुरशीची लढत पाहायला मिळाली. २२ मे रोजी उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला. पण काही मिनिटांतच अनिमेशने १०.१५ सेकंदांची धाव घेत तो विक्रम मोडीत काढला.

मात्र अंतिम फेरीत गुरिंदरवीरने जोरदार पुनरागमन करत सर्वांनाच मागे टाकले. १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवत त्याने राष्ट्रीय विक्रम पुन्हा आपल्या नावे केला आणि आगामी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

The post गुरिंदरवीरने रचला नवा राष्ट्रीय विक्रम, फेडरेशन कपमध्ये सुवर्णपदक appeared first on Berar Times.

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्सही जाळल्या, सीबीआयच्या तपासातून उघड
पुणे/वृत्तसेवा-नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना शुक्रवारी अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा हवालदार हिने फिजिक्सचे प्रश्न पैशे घेऊन विकल्याची माहिती सीबीआयच्या तपासातून समोर आली आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रश्नसंचाचे नोट्स जाळल्याचे देखील तपासात उघड झाले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट परीक्षेसाठी मनीषा हवालदार हीची भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची माहिती आणि प्रश्न थेट तिच्याकडे उपलब्ध होते. या गैरफायदा घेत मनीषा हवालदारने नीट संबंधित प्रश्नांच्या हस्तलिखित नोंदी तयार करून स्वतःकडे ठेवल्या होत्या. संबंधित प्रश्न व्हॉट्सअँप आणि प्रिंटआउट काढून दिले, त्याबदल्यात रोख रक्कम स्वीकारली, अशी माहिती समोर येत आहे.

तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा कोणताही पुरावा हाती काही लागू नये म्हणून आरोपी मनीषा हवालदार हिने भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न असलेल्या नोट्स जाळून नष्ट केले. तसेच हवालदारने मनीषा मांढरेसोबत केलेले चॅटिंग सुद्धा डिलिट करण्यात आले आहे. मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरेमध्ये व्हॉट्सअॅप चॅट झाले होते, त्याचे मेसेज डिलिट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा मनिषा मांढरेला प्रश्न पाठवल्याची माहिती सीबीआय तपासातून समोर आली आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मनिषा हवालदार यांनी भौतिकशास्त्राचे प्रश्न मनीशा मांढरे यांना दिल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) नीट परीक्षेसाठी मनीषा हवालदार हीची भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अत्यंत गोपनीय प्रक्रियेची माहिती आणि प्रश्न थेट तिच्याकडे उपलब्ध होते. एप्रिल 2026 दरम्यान तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न मनीषा मांढरे यांना दिल्याचे तपासातून समोर आले आहे. तपासादरम्यान, हवालदार हिने लीक केलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न तंतोतंत जुळल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

सीबाआयने मनीषा हवालदारचा मोबाईला ताब्यात घेतला असून डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तपासात धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेनं मनिषा हवालदारच्या राहत्या घरातून महत्त्वाची कागदपत्रं, कम्प्यूटरची हार्ड डिस्क आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केलीे आहेत.

नीट पेपरलीक प्रकरणात मनीषा मांढरे यांनी देखील अशीच शक्कल लढवली आहे. तिने देखील कोणताही पुरावा मागे सोडला नाही. त्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे तिने जिवशास्त्राचे सर्व प्रश्न तोंडपाठ केले आणि बाहेर आल्यानंतर ते हाताने लिहून काढले. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली आहे. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतल्यानंतर सीबीआयने तिला अटक केली.

सीबीआय तपासातून या घोटाळ्याचा मुख्य कट पुण्यात रचला गेल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि लातूरमधील केमेस्ट्रीचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांनी मिळून जानेवारी महिन्यातच हा कट रचला. त्यांनी हाताने लिहिलेले प्रश्न आणि उत्तरे शिवराज मोटेगावकर यांना पाठवली. यानंतर मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि त्याचे पीडीएफ बनवून पैशांच्या बदल्यात निवडक विद्यार्थ्यांना विकले. परीक्षा आटोपल्यानंतर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केल्यानंतर मोटेगावकर याला अटक केली.

The post मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्सही जाळल्या, सीबीआयच्या तपासातून उघड appeared first on Berar Times.

नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश द्या-मुख्यमंत्री विजय जोसेफ
नवी दिल्ली/वृत्तसेवा-देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारने एनटीए या संस्थेकडे सोपवली. मात्र ही संस्था नीट परीक्षा संपन्न करण्यास अपयशी ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी नीट परीक्षेचे पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर आता यंदाही परीक्षेचे पेपर लीक झाले आहे. वारंवार होणार्या या घटनांवरून आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. नीट परीक्षा रद्द करून राज्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तामिळनाडू सरकारने यापूर्वी देखील नीट परीक्षेचा विरोध केला आहे. आता परत या राज्यात विरोध सुरू झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे नीट प्रणाली श्रीमंत, शहरी आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना अनुकूल आहे आणि त्यामुळे असमतोल निर्माण होतो. सरकारचा असा युक्तिवाद आहे की, ही प्रणाली स्थानिक भाषेत शिक्षण घेतलेल्या आणि खाजगी शिकवणीचा खर्च न परवडणाऱ्या, आशादायक परंतु वंचित ग्रामीण विद्यार्थ्यांना वगळते. याच आधारावर, तामिळनाडू नीटमधून सूट देण्याची मागणी करत आहे.

आता पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री थालापती विजय यांनी नीटचा विरोध केला आहे. एक्सवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, विजय यांनी निदर्शनास आणून दिले की नीटच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. विजय म्हणाले कि 2024 चा पेपर फुटला होता आणि सहा राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले होते, जे नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले.

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांच्या एका उच्चस्तरीय समितीने सुधारणांसाठी 95 शिफारसी केल्या होत्या. असे असूनही, केवळ दोन वर्षांतच पुन्हा पेपरफुटी झाली, ज्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. ते म्हणाले, समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ही परीक्षा त्रुटी आणि दोषांचा एक भक्कम पुरावा आहे.

विजय पुढे म्हणाले कि तामिळनाडू सरकारने नीटच्या स्थापनेपासूनच त्याला सातत्याने विरोध केला आहे. नीटच्या अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील, सरकारी शाळांमधील, तमिळ-माध्यम पार्श्वभूमी असलेल्या आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तामिळनाडू सरकार आपल्या जुन्या मागणीचा पुनरुच्चार करत आहे की नीट परीक्षा रद्द करण्यात यावी आणि एमबीबीएस, बीडीएस व आयुष अभ्यासक्रमांमधील सर्व जागा इयत्ता 12 वीच्या गुणांच्या आधारे राज्य कोट्याअंतर्गत भरण्याची परवानगी राज्यांना देण्यात यावी.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या वर्षी, तत्कालीन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी नीट मधून सूट मिळवण्यासाठी सादर केलेले विधेयक राष्ट्रपतींनी फेटाळले होते. यानंतर नोव्हेंबरमध्ये, राज्याने राष्ट्रपतींच्या या निर्णयाला आव्हान देत सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली.

माहित असावे कि 3 मे रोजी झालेला नीट पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला जवळपास 23 लाख विद्यार्थी बसले होते. सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाशिक येथील शुभम खैरनार, जयपूर येथील मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल आणि गुरुग्राम येथील यश यादव यांचा समावेश आहे. या आरोपींमधील दिनेश बिवाल हा भाजपाचा नेता आहे.

पेपरफुटीमुळे गाजलेल्या नीट परीक्षेच्या अलीकडील प्रकरणानंतर, देशभरातील विद्यार्थी आणि पालक पुन्हा एकदा संताप व्यक्त करत आहेत. विद्यार्थी संघटनांनी एनटीए या संस्थेला बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

The post नीट परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश द्या-मुख्यमंत्री विजय जोसेफ appeared first on Berar Times.

इंडिगो व स्टारएयरची गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी सेवा बंद
गोंदिया,दि.०५(खेमेंद्र कटरे) : गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून थेट हैदराबादसाठी गोंदिया-हैदराबाद सुरु झालेली विमान सेवा अखेर २ वर्ष चार महिन्यानंतर बंद करण्यात आल्याने प्रवाशामध्ये संतापाची लाट आहे.त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विकासात्मक गोष्टींचा फोलपणा उघड झाला आहे.इंडिगो विमान कंंपनीनेे गोंदिया विमानतळावरुन पुर्णतः१ मे २०२६ पासून प्रवाशी तिकीट बुकिंग बंद केले आहे.

१ डिसेंबर २०२३ रोजी इंडिगो कंपनीद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली विमानसेवा ३० एप्रिल २०२६ पर्यंत नियमित सुरु होती.मात्र यातच नियमित असलेली गोंदिया हैद्राबाद-गोंंदिया विमानसेवेला मात्र ब्रेक लागला आहे.

दरम्यान बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक गिरीशचंद्र वर्मा यांना विचारणा केले असता विमानतळ प्राधिकरणाकडे इंडिगो व स्टार एयर या दोन्ही विमानकंपन्यांनी विमानसेवा सुरु ठेवण्यासंदर्भात काहीही निरोप दिला नसून आजच्या घडीला गोंदिया विमानतळावरुन एकही प्रवासी विमान सेवा सुर नसल्याची पुष्टी केली.

तर गोंदिया- इंदुर ही स्टार एयरची सेवा १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झालेली असून गोंदिया ते इंदूर मार्गावर सुरू आहे.स्टार एयरने ही सेवा १५ जानेवारी २०२६ पासून ही सेवा मुंबई व बंगळूर शहराशी जोडली आहे.ही विमानसेवा आठवड्यातून काही विशिष्ट दिवशी (मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार) उपलब्ध होती,ही सेवा पण बंद झालेली आहे.

फ्लायबिग कंपनीने  गोंदिया ते हैदराबाद आणि इंदूरची विमानसेवा सुरू केली होती.मात्र, फ्लायबिग एअरलाइन्सने सुरू केलेली ही विमानसेवा २१ ऑगस्ट २०२३ पासून बंद झाली.त्यानंतर इंडिगो कंपनीने गोंदियाच्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु केली असून आजपर्यंत हजारो प्रवाश्यांनी या विमानतळावरुन प्रवास केला आहे.

विमानतळावर नाईट लॅंडीगची सोय

विमानांच्या उतरणी आणि उड्डाणासाठी विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) बसवण्यात आले आहे. यामुळे विमाने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी विमानतळावर उतरू शकतील अशी सुविधा गोंदियाच्या बिरसी विमानतळावर उपलब्ध झालेली आहे.विशेष म्हणजे ही प्रणाली बसविल्यानंतरच गोंदिया इंदुर हि विमानसेवा सायकांळच्यावेळेस सुरु झाली होती.

४ वर्षापुर्वी सुरु झाली होती प्रवाशी विमानसेवा

गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून तब्ब्ल ७९ वर्षानंतर १३ मार्च २०२२ रोजी इंदुर-गोंदिया -हैद्राबाद या प्रवाशी वाहतूक विमान सेवेला केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस सुरवात करण्यात आली होती.

The post इंडिगो व स्टारएयरची गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी सेवा बंद appeared first on Berar Times.