दुर्गादेवी विसर्जनाला गेलेल्या मक्काटोल्यातील युवकाचा मृत्यू

0
517

आमगाव,दि.26ःः आमगाव पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मक्काटोला येथे 25आक्टोंबरला दुर्गादेवी विसर्जनाकरीता गेलेल्या एका 27 वर्षीय युवकाचा तलावातील किचडात पाय घसरुन पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.मृत युवकाचे नाव दुर्गेश कारुजी वट्टी असे आहे.गावातील नवयुवक दुर्गा उत्सव समितीच्यावतीने ठेवण्यात आलेल्या दुर्गादेवीची मुर्ती विसर्जनाकरीता गावातील तलावाकडे गेलेला होता.पोलिसांनी मृतकाच्या वडीलाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.