नूतन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रभार स्वीकारला

0
489

वाशिम, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून शण्मुगराजन एस. यांनी आज, २६ ऑक्टोबर रोजी प्रभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्याकडून त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली.  जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी धारणी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. रुजू झाल्यानंतर नूतन जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग, नियंत्रण आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय योजना, चाचण्यांची स्थिती याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.