31.4 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home गुन्हेवार्ता गणेशनगरातील ज्वेलर्समधून २५ लाखांचे दागिने असलेली बॅग पळविली,आरोपी सीसीटीव्हीमध्यै कैद

गणेशनगरातील ज्वेलर्समधून २५ लाखांचे दागिने असलेली बॅग पळविली,आरोपी सीसीटीव्हीमध्यै कैद

0
548

blank

गोंदिया,दि.05 :शहर पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या गणेश नगर येथील आभूषण ज्वेलर्स दुकानाच्या काऊटंरवर ठेवलेली २५ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची बॅग एका अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना आज गुरुवारी(दि.५) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.दरम्यान बँग घेऊन फरार होणारा चोरटा युवक सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.घटनेनंतर शहर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांने तपास मोहिम पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात सुरु केली आहे.

प्राप्त माहितीनुसार गणेश नगर येथे संजय सोनी यांच्या मालकीचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते आज सकाळी दुकानात सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवून दुकानात पोहचले. दुकान उघडल्यानंतर त्यांनी काऊंटरवर सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवली. दरम्यान ते पूजा करीत असताना एका तरुणाने त्यांच्या दुकानात प्रवेश करुन दागिने असलेली बॅग उचलून पळ काढला. तो दुकानातून रस्त्य्यावर येताच दुसरा आरोपी मोटारसायकल घेवून दुकानसमोर आला. यानंतर ते दोघेही युवक मोटारसायकलवरुन पसार झाले. आभूषण ज्वेलर्सचे मालक संजय दुर्गाप्रसाद सोनी रा. गौशाला वार्ड यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.