पोलिसांच्या खासगी वाहनाला अपघात,एक पोलीस कर्मचारी ठार,तीन ते चार जखमी

0
1280

गोंदिया,दि.13ः-जिल्ह्यातील सालेकसा पोलिसांच्या खासगी वाहनाचा अपघात होऊन, एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडली. अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत सालेकसा पोलिसांनी दिवाळी साजरी केली. त्यानंतर परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.सालेकसामधील पाथरा टोला या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात विनोद मारबदे (३०) या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. तर, राजू पंधरे, बाळकृष्ण जांबुळकर, खेमराज कोरे हे तिघे जखमी झाले. जखमींना गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आदिवासी बांधवांमध्ये आनंद पसरवून येत असताना, ऐन दिवाळीत पोलीस शिपायाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.