दारु पिण्याच्या वादावरुन वडीलांनेच मुलाला केले ठार

0
554

गोंदिया,दि.15ःजिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या कोसमतोंडी येथील मिलटोली परिसरात दारु पिण्याच्या वादावरुन झालेल्या भांडणात वडीलाने आपल्यावरील नियंत्रण सोडत रागाच्या भरात धारदार शस्त्राने स्वत: च्या मुलावर वार करुन ठार केल्याची घटना 13 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली.मृताचे नाव राजकुमार उर्फ ​​चमन चरणदास नेवारे (27 वर्षे) असे आहे.याप्रकरणी डुगीपार पोलिसांनी फिर्यादी हिवराज पंढरी कालसर्पे यांच्या तक्रारीवरुन कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव बी. जाधव करीत आहेत.