पाच लाखाच्या बिबट कातङ्यासह तीन आरोपींना अटक 

0
563
गोंदिया- नवेगावबंध पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या भिवखिडकी गावातील लांजेवर राईस मिलजवळ पाच लाख रुपयांच्या बिबट्याच्या कातडीसह तीन आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती भंडारा जिल्ह्यातून बिबट्याची कातडी,नख विक्रीसाठी गोंदिया जिल्हातील भिविखिडकी येथे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली.त्यावर लगेच कारवाई करण्यासाठी नवेगावबांध पोलीस ठाण्याचे निरिक्षक बी.डी.बोरसे यांना माहिती देत तपास करण्याच्या सुचना देण्यात आल्या.तपासादरम्यान तीन इसम भिवखिडकी येथील लांजेवार यांच्या राईसमिलजवळील शेतपरिसरात तीन व्यक्ती असल्याची खात्री पटल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, दात आणि पंजां असा 5 लाख रुपयांत बोलणी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.आरोपीमध्ये देवीदास दागो मरसकोल्हे (वय 52,झाडगाव ता.साकोली),मंगेश केशव गायधने (44 रा.कोहरा.ता.लाखनी) व रजनीश पुरुषोत्तम पोगडे (वय 32 ,रा. साकोली) सर्व राहणार भंडारा जिल्हा यांचा समावेश आहे.आरोपिंना पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून वनअधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरें, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालुकुल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बी.डी बोरसे,पोलीस, उपनिरीक्षक नरेश ऊरकूड़े, हवालदार कोडापे,शिपाई मडावी, चांदेवार,कोरे, देशमुख, भोगारे, मस्के, डहारे, लांडगे, क्षीरसागर , डोंगरवार ,बर्वे, श्याम कोकोडे, सोनवाने, वन अधिकारी अग्रिम सैनी, एनटी चौहान, विशाल बोराडे यांनी पार पाडली.