चाबी संघटन लढणार जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूका-आमदार विनोद अग्रवाल

0
700

गोंदिया,दि.19ः-जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण जिल्ह्यात जोरात सुरू झाली आहे. विधानसभा निवडणूक अपक्ष लढवूण जिंकणारे आमदार विनोद अग्रवाल यांनी कोणत्याही पक्षासोबत न जाता चाबी संघटन येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका संपूर्ण ताकतीने लढणार असल्याची औपचारिक घोषणा केली. छत्रपाल तुरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार विनोद अग्रवाल समर्थकांची आढावा बैठक कामठा येथे पार पडली,त्या बैठकीत ते बोलत होते.आमदार विनोद अग्रवाल यांनी सुरुवातीला वर्षभरात केलेली कामाचा पाढा वाचला व त्यानंतर माजी आमदार यांच्यावर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांना एकवटण्याची व वर्षभरात केलेली कामे नागरिकापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

या आढावा बैठकीत मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून छत्रपाल तुरकर यांच्यासह आमदार विनोद अग्रवाल पृथ्वीराज सिंह नागपुरे, मुनेश राहंगडाले, कशिश जायस्वाल, अनिल हुदांनी, शिव शर्मा, दुर्गेश राहंगडाले, चैताली सिंह नागपुरे, धनंजय तुरकर, जितलाल पाचे, सुजीत येवले, बेबी अग्रवाल, ज्ञानचंद जमईवार, लखन हरिणखेडे, कमलेश सोनवाने, मोहन गौतम, सुभानराव राहंगडाले, अंकेश येडे, रामराज खरे, परसराम हुमे, हंसराज वासनिक, अनिल मते, शुभाष मुंदडा, शंकर नारनवरे, लिलेश्वर कुंभरे, मुकेश हलमारे इत्यादि मंडळी मंचावर उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर दुबे, मिलन पाथोडे, फिरोज बंसोड, रमेश येडे, किशोर लील्हारे, सूरज लील्हारे, प्रदीप दहिकर, पवन गौतम, आशीष आस्वले, सुरपत खैरवार, नीलेश उमरे, प्रकाश सेवतकर, भूमेश्वर कटरे, जियालाल बोपचे, देवा मारवाडे, गणेश भेलावे, अभिमन्यु साठवणे, झिंगर पटले, विककी बघेले, आत्माराम भेलावे, मदनलाल पटले, राजू ब्राह्मणकर, नरेश येडे, चेतन बहेकार, मनमोहन श्रीवास, मिथुन पाचे, धनलाल बाहे, भैय्यालाल ठाकूर, सुखचंद येडे, प्रीतम मेश्राम, सुधीर चंद्रिकापुरे, शेखर वाढवे, लखन मेंढे, छोटू तुरकर, भरतलाल बिसेन, मुकेश पाल, बेनिराम फूलबांधे, देवराम हेमणे, दीनदयाल गायधणे, मुकेश राहंगडाले, रोशन पाथोडे, गजानन बिसेन, देवानंद पटले, महेश मेश्राम, मदनलाल तुरकर, शेखर शहारे, हिमांशु कटरे, सूर्यामणी राहंगडाले, बालू बिसेन, कैलाश कुंजाम, शंकर अटरे, प्रीतम मेश्राम, सुधीर चंद्रिकापुरे, शालिक रक्से, बळिराम शरणागत, खेमराज भाजीपाले, सदूभाऊ शेंडे यांनी परिश्रम घेतले. व विनोद अग्रवाल समर्थक मोठ्या संखेत उपस्थित होते.