स्कार्पिओ-मोटारसायकल अपघातात महिला ठार पतीसह दोन मुले जखमी

0
473

दिघोरी/मोठी :सासूरवाडी येथून भाऊबिज आटोपून दिघोरी/मोठी येथे येत असलेल्या मोटारसायकलला साकोली-लाखांदूर रस्त्यावरील कोदामेडी जवळ भरधाव स्कार्पिओने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत पत्नी सुषमा दिलीप रोकडे (३५) हिचा मृत्यू झाला. तर पती दिलीप रोकडे, मुलगा सुरज (१०) व मुलगी वंशू (७) जखमी झाले. सदर अपघात दि.१८ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ७ वाजता दरम्यान घडला.
दिघारी/मोठी येथील दिलीप रोकडे हा सासूरवाडी येथे मोटारसायकल क्र.एम एच ३६ बी १२११ या गाडीने पत्नी सुषमा व दोन मुलांसह गेले होते. भाऊबिज आटोपून गावाकडे कुटूंबासह येत असलेल्या दिलीप रोकडे यांच्या मोटारसायकलला कोदामेडी जवळ विरूद्ध दिशेने येणाNया स्कार्पिओ क्र.एम एच १३ एझेड ७६७३ या गाडीने धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील पती पत्नीसह मुलगा व मुलगी जखमी झाले. जखमी पत्नी व दोन मुलांना उपचाराकरीता जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. मात्र सुषमा रोकडे हिचा वाटेतच मृत्यू झाला. तर जखमी दिलीप रोकडे याला उपचाराकरीता ब्रम्हपूरीला नेण्यात आले. सुषमा हिच्या अपघाती मृत्यूने गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी दिलीप याच्या दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाल्याचे सांगितले जाते. तर जखमी दोन्ही मुलांवर जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहे.