अशोक कौशिक हत्याकांडात तीन आरोपी अटकेत

0
391

गोंदिया -स्थानिय गणेश नगर निवासी ट्रांसपोर्ट व्यवसायी अशोक बाबूलाल कौशिक यांच्या 21 आगस्टला झालेल्या हत्याप्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी तिघाना अटक करुन न्यायालयात हजर केले असता 27 आगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यामध्ये छोटा गोंदिया गोविंदपुर निवासी सतीश बनकर, दीपक भूते, गौशाला वार्ड बिरसी गैरेज जवळील चिंटू शर्मा यांचा समावेश आहे. 21 आगस्टला सकाळी 8 वाजेच्या सुमारास कौशिकची हत्या गोळी घालून करण्यात आली होती.मृतकाची पत्नी रेखा अशोक कौशिकच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता.याप्रकरणात  कलम 302,सहकलम 3,27 भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे ,अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी ही कारवाई केली.