31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ युवासेना संगठन बांधनी पहिल्या टप्याची सुरुवात

युवासेना संगठन बांधनी पहिल्या टप्याची सुरुवात

0
44

blank

अर्जुनी/मोर:- युवा सेना राष्ट्रीय सचिव वरून सरदेसाई यांच्या पदाधिकारी संवाद दौऱ्यानंतर प्रेरणा घेऊन संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात युवासेना संघटनेच्या मजबूत बांधणी करिता पहिल्या टप्प्याचे शुभारंभ अर्जुनी मोरगाव येथून करण्यात आली .यादरम्यान युवकांचे संघठन ,पदाधिकार्‍यांची नियुक्ती ,युवकांच्या समस्येचे निराकरण ,त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याकरिता संपूर्ण जिल्ह्यात युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम ,कगेश राव तर्फे प्रत्येक तालुक्यात युवासेना संगठन बांधणी अभियान राबविले जाणार आहे. पहिला टप्पा अंतर्गत तालुका युवासेना अर्जुनी/मोरकरिता हितेश हिवराज शहारे यांची युवासेना तालुका उप युवाधिकारी पदावर नियुक्ति करण्यात आली.आयोजित कार्यक्रम दरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल,जिल्हा सचिव संजयसिंह पवार,तालुका प्रमुख चेतन दहिकर,युवासेना जिल्हा युवाधिकारी अश्विनसिंह गौतम,शिवसेना शहर प्रमुख प्रकाश उइके,युवासेना तालुका उप युवाधिकारी छत्रपाल कापगते, युवासेना शहर अधिकारी महेश शाहारे,वरिष्ठ शिवसैनिक यादव कुम्भरे,आदि प्रमुख्याने उपस्थीत होते.

blank