
गोंदिया,दि.22 : तालुक्यातील रावनवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम रजेगाव येथे नराधम मुलानेच आपल्या जन्मदात्रीवर जबरदस्ती करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दि. 21 ऑगस्टला सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान घडल्याने तक्रारीवरुन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर असे की,रजेगाव येथील फिर्यादी महिलाने रावणवाडी पोलीस ठाणे गाठून 21 आँगस्ट रोजी सायंकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास शेतीच्या कामावरुन घरी आल्या असता त्यांचा मोठा मुलगा वय 25 वर्ष हा दारुच्या नशेत होता. फिर्यादी घरी आल्यानंतर आरोपी हा दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु फिर्यादीने आरोपीकडे दुर्लक्ष केले व आंघोळ करण्यासाठी निघून गेल्या. आंघोळ झाल्यानंतर फिर्यादी त्यांचे भिजलेले कपडे दोरीवर वाळवत असताना त्यांचा आरोपी मुलगा प्रविणने रुममध्ये बोलावले.त्यावेळी फिर्यादीला आरोपी दारु पिण्यासाठी पैसे मागत असेल असे वाटून फिर्यादी त्याच्याजवळ गेल्या असता त्याने रुमचा दरवाजा बंद करुन फिर्यादीला हाताने मारहाण करुन पलंगावर झोपवले.फिर्यादीने आरोपी ला ‘मी तुझी आई आहे’ याची आठवण करुन दिली असता त्याने फिर्यादीचा गळा दाबून फिर्यादीचे तोंड बंद केले. त्यांनतर फिर्यादीच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीने प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला मारहाण केली व फिर्यादीचे दोन्ही हात पकडून फिर्यादीच्या गालाचा चावा घेवून फिर्यादीवर बळजबरीने अतिप्रसंग करीत घटनेबाबत सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन गुन्हा क्रमांक 378/2021 कलम 376, 323, 506 भादंविनव्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांचे मार्गदर्शनात स.पोलीस निरीक्षक बाळासाहेब सरवदे करीत आहेत.