चुलोद येथील बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रम साजरे

0
50

गोंदिया,ता.22ः तालुक्यातील चुलोद येथील नवचैतन्य बुद्धविहारात पाचवे वर्षावास व सहविचार प्रवचन कार्यक्रम रविवारी (ता.22)उत्साहात साजरे करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा सर्कल नवरगाव कला तसेच नवचैतन्य बुद्ध विहार चुलोद यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवरगाव सर्कल चे अध्यक्ष ओंकार उके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार प्रमुख नरेंद्र गजभिये, महासचिव हेमराज चंद्रिकापूरे, वासुदेव कठाने ,राजेश डोंगरवार, देवेंद्र रामटेके, सिद्धार्थ कोल्हे,श्रीकांत भालाधरे,नानाजी मेश्राम,हंसराज चौरे, कमलदास चंद्रिकापूरे,प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात द्विपप्रजवलाने व बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी संस्कार मार्गदर्शक व प्रमुख वक्त्यांनी बुद्ध धम्म आचरणावर प्रकाश टाकून वर्षावासाचे महत्व पटवून दिले.याचबरोबर बुद्ध धम्म समाजात रुजविण्यासाठी सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न करून त्याचा प्रचार व प्रसार करावा अशे आव्हानही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध बंधू भगिनी व लहान मुले मुली उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेंद्र कोल्हे, सदाशिव कोल्हे, शामलाल भालाधरे,रवींद्र मेश्राम, अशोक चौरे, राष्ट्रपाल वैद्य,प्रतिमा भालाधरे,निर्मला मेश्राम, नम्रता चौरे, माया बोरकर, रक्षा भालाधरे,रश्मी वैद्य, आशा चौरे ,इंदूबाई कोल्हे,सुहानी कोल्हे,,शिंधु बाई भिमटे, सुर्यकांता बाई नागदेवे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे संचालन हेमराज चंद्रिकापूरे तर आभार नानाजी मेश्राम यांनी मानिले.