तिरोडा पोलिसांचे 5 दारू अड्ड्यांवर छापे; ₹ 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त

0
54

तिरोडा, दि.27 : पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्यात Operation Wash Out मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवार, 26 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून तिरोडा पोलिसांनी दुपारी 12.30 ते 15.30 वाजतापर्यंत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत 5 अवैध दारू अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून तब्बल ₹ 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Operation Wash Out मोहिमेंतर्गत झालेली कारवाई

Operation Wash Outतिरोडा पोलिसांनी सुखवंता बाबुराव बरियेकर (वय 55) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा या महिलेची घरझडती केली. त्यात 25 प्लास्टिक चुंगडीत 80 हजार रुपये किंमतीचा 1000 किलो सडवा मोहफूल आढळला. सदर माल जप्त करण्यात आला.शकुंतला कुवरदास बिंझाडे (वय 55) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 48 प्लास्टिक चुंगडीत 1920 किलो सडवा मोहफूल मिळून आला. सदर माल 1 लाख 53 हजार 600 रुपये किंमतीचा असल्याचे सांगण्यात आले.

मिलन कुवरदास बिंझाडे (वय 25) रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरझडतीत 45 प्लास्टिक चुंगडीत 1800 किलो सडवा मोहफूल आढळला. सदर मालाची किंमत 1 लाख 44 हजार रुपये आहे.संजय सोविंद बरियेकर (वय 35) रा. रामाटोली-सिली याची घरझडती करण्यात आली. त्यात 65 प्लास्टिक चुंगडीत 1360 किलो सडवा मोहफूल मिळाला. सदर मालाची किंमत 1 लाख 08 हजार 800 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पाचव्या कारवाईत पिंटू उर्फ नितेश अशोक नेमपाडे (वय 35) रा. करटी याच्या दुकानाची घरझडती करण्यात आली. त्यावेळी 1 हजार रुपये किंमतीची 10 लिटर मोहफुलांची दारू आढळली. सदर माल जप्त करण्यात आला.अशाप्रकारे Operation Wash Out  मोहिमेत एकूण 4 लाख 87 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे (गोंदिया-अतिरिक्त कार्यभार तिरोडा) यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत महिला पोउपनि राधा लाटे, पोहवा उईके, नापोशि श्रीरामे, बर्वे, बांते, रक्षे, कुलमते,  भूमेश्वरी तिरळे, प्रधान, पोलीस शिपाई विदेशकुमार अंबुले, येरणे, कोरचे, मपोशि नंदा बडवाईक, येडे यांनी केली.