33.7 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता देशी कट्टा व चार जिवंत काडतूसांसह युवकाला अटक

देशी कट्टा व चार जिवंत काडतूसांसह युवकाला अटक

0
60

blank

चंद्रपूर,दि.31-चंद्रपुरात माऊझर हा देशी कट्टा व चार जिवंत काडतूसांसह एका युवकाला चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथकास गोपनिय बातमीदाराकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार सागर येलपावार हा भिवापुर वार्डातील युवक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामागील टॉवर टेकडी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तीवरील पथक घटनास्थळी रवाना झाले. तिथे पोहचताच रात्रीचे दीड वाजताच्या सुमारास एक संशयित इसम आढळून आल्याने टॉवर टेकडीकडुन येणारे कच्च्या रोडने अंधारात एकटाच चालत येताना दिसला. त्याच्यावर संशय वाटल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता एक देशी बनावटीचे पिस्टल(माऊझर) व चार जिवंत काडतुसे हे सापडली. त्याचे अंदाजित मुल्य 32 हजार रुपये आहे. देशी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करुन आरोपी सागर येलपावार विरुध्द रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 855/21 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.

blank