जुगार खेळणारे 6 आरोपी देवरी पोलिसांच्या ताब्यात

0
61

देवरी 01: येथून 5 किलोमीटर अंतरावरील शेडेपार येथे अवैध जुगार अड्यावर देवरी पोलिसांनी धाड घालून 6 आरोपींना ताब्यात घेत साडे सोळा हजाराचा ऐवज जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरी पोलिसस्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शेडेपार येथील एका घरात काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे देवरीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी आपल्या ताफ्यासह जुगार अड्ड्यावर धाड घातली. या धाडीत राजेश ढवळे (29), सोमचरण प्रधान (33), रवींद्र मडावी (30) कुंदन गावलकर (24), अश्विन राऊत, शामा मडावी असे सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या आरोपीकडून पोलिसांनी  700 रुपये, तासपत्ते आणि 1 मोटारसायकल असा  16 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर कार्यवाही देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांचे नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे, हवालदार औरासे , नायक न्यायमूर्ती, करंजेकर,परसमोडे, मस्के ,शिपाई डोहळे यांनी केली.