जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागादेखील चौकशीकामी ताब्यात

0
70

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि वकिल आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतल्या सुखदा इमारतीतून बाहेर पडत असताना गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आलं. याआधी अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यासमोरच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. पण एकदाही देशमुख चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याव दबाव वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.