चिचगड येथे मोबाईल टाॅवरच्या बॅटरीची चोरी

0
38

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

चिचगड,दि.०4ः-पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या चिचगड येथून एक सप्टॆंबरच्या रात्री अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी टॉवर विजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या २४ लागलेल्या बॅटऱ्यापैकी २२ बॅटऱ्या चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.बॅटरीचे अंदाजे रक्कम १ लाख ४७ हजार ८२३ रुपये असे सांगण्यात आले. त्यानुसार गुन्हा नोंद करून कलम ३७९ नुसार अज्ञात आरोपीवर विरुद्ध गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास पीएसआय मनोहर इस्कापे करीत आहेत.