वीज पडून शेतकरी व बैल ठार

0
194

चिचगड,दि.04: देवरी तालुक्यातील विजांच्या गडगडाटीसह झालेल्या पावसात चिचगड पोलीस ठाण्यातंर्गत विज पडून  शेतकऱ्याचा व एका बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारला(दि.3) सायंकाळी ४ वाजता घटना घडली.यातील मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव कैलास देशमुख (24 वर्ष ) असे आहे.सदर घटनेची तक्रार पोलीस स्टेशन चिचगडला नोंद करून कलम 174 अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास एएसआय सोनजाल करीत आहेत.