देशी बंदुकीसह भुसावळचे दोघांना पकडले

0
37

धारणी-धारणीपासून 70 किमी अंतरावरील पाचोरी (खकनार मध्यप्रदेश) येथून दोन देशी बनावटीच्या पिस्तुली तर सोबत दोन जीवंत काडतुससह महाराष्ट्रातील भुसावळ जिल्ह्यातील दोन युवकांना पकडण्यात आल्याने मध्यप्रदेशातून आताही महाराष्ट्रात अवैध हत्यारांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे.
बुरहानपूर मध्यप्रदेशचे पोलिस अधीक्षक राहुलकुमार लोढा यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिषेक दिवान आणि खकनारचे ठाणेदार के.पी. धुर्वे यांनी पाचोरीकडून पांगरी मार्गावर भुसावळच्या दोन जणांना पोलिस निरीक्षकांनी रोखून दोन जापान मेड पिस्तुली व दोन काडतुस हस्तगत करताना दोघांना अटक केली.
घटना 9 सप्टेंबरची असून आरोपींचे नाव नवाब लाल मोहम्मद (34) तथा सचिन अरविंद भालेराव (20) रा. हुडको कॉलनी भुसावळ असे आहे. माहितीप्रमाणे धारणी तालुक्याच्या सीमेवरील खकनार जवळच्या जंगलात पाचोरी गावात अवैध पिस्तुलीसह इतर हत्यारे बनविली जातात. ठाणेदार के.पी. धुर्वे हे या गावाच्या मार्गावर सतत नजर ठेऊन होते. संशयास्पदपणे दुचाकीवर पिस्तुलीसह दोघांना थांबवून तपासणी करण्यात आली.