16 आरोपींवर गुन्हे दाखल ; ₹12.64 लाखांचा माल जप्त

0
90

तिरोडा पोलिसांची छापेमार कारवाई : , अवैध अड्ड्यांना वॉश आऊट 

तिरोडा, दि.12 : सध्या सुरु असलेला गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी ऑपरेशन वॉश आऊट सुरु केलेले आहे. त्या अंतर्गत तिरोडा पोलिसांनी छापेमार कारवाई सुरू केली आहे. यात तब्बल 16 आरोपींवर गुन्हे दाखल करून एकूण ₹12.64 लाखांचा माल जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांनी तिरोडा पोलिसांच्या वारंवारच्या कारवाईला घाबरून तिरोडा परिसरातील घनदाट जंगल, नदी, नाले यांच्या पलीकडील भागात दारू गाळणे सुरू केले. जिथे पोलीस पोहचणार नाही, अश्या भागात भट्टी लावून अवैध दारू काढत आहेत. अशी माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहितीवरून 11 व 12 सप्टेंबर विशेष मोहीम राबवून सदर कारवाई करण्यात आली आहे.

)अनिल कुवरदास बिनझाडे रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या जमुनिया जंगल परिसरातील अड्ड्यावरून 30 प्लास्टिक चुंगडीत 450 किलो सडवा मोहाफुल किं. 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुखवंता बाबुराव बरीयेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 30 प्लास्टिक चुंगडीत 450 किलो सडवा मोहफुल किं. 45 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कलीम गफूर पठाण रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरझडतीत 35 मोठया प्लास्टिक चुंगडीत 700 किलो सडवा मोहफुल किं. 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पूर्णा प्रल्हाद तांडेकर रा. संत रविदास तिरोडा या महिलेच्या घरझडतीत 22 प्लास्टिक चुंगडीत 440 किलो किंमत 35 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.साबीर रहीमखा पठाण रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या घरझडतीत 25 प्लास्टिक चुंगडीत 500 किलो सडवा मोहाफुल किं. 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तोशिफ सलीम पठाण रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा यांच्या घरझडतीत 17 प्लास्टिक चुंगडीत 340 किलो सडवा मोहफुल किं. 27 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोपी अनिल कुंभरे रा. काचेवानी याच्या अदानी पॉवर प्लांटच्या पाठीमागील झुडपी जंगल परिसरातील अड्ड्यावर 46 प्लास्टिक चुंगडीत 920 किलो सडवा मोहफुल किं. 73 हजार 609 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर माल जप्त करण्यात आला.चंद्रशेखर देवराव टेंभेकर रा. कोडेलोहारा याच्या कोडेलोहारा जंगल परिसरातील अड्ड्यावर 6 प्लास्टिक मोठया चुंगडीत 240 किलो सडवा मोहफुल किं. 19 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.

विजय दामाजी उके रा. सुकडी याच्या घरझडतीत 2 हजार रुपये किंमतीची 20 लिटर मोहफुलांची दारू जप्त करण्यात आलेली आहे.रवी भय्यालाल कुंभारे रा. काचेवानी याचे घरझडतीत 5 हजार रुपये किंमतीची 5o लिटर मोहफुलांची दारू जप्त करण्यात आलेली आहे.मारुती नरसय्या बंडीवर रा. लाखेगाव याच्या घरझडतीत 5 हजार रुपये किंमतीची 50 लिटर मोहफुलांची दारू मिळून आल्याने जप्त करण्यात आलेली आहे.तरासान अशोक बरयिकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा या महिलेच्या घरझडतीत 43 प्लास्टिक चुंगडीत 860 किलो सडवा मोहाफुल किं. 70 हजार 520 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.कविता सेवकराम तांडेकर रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 18 प्लास्टिक चुंगडीत 360 किलो सडवा मोहाफुल किं. 28 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.शिला विनोद खरोले रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा हिच्या घरझडतीत 11 प्लास्टिक चुंगडीत 220 किलो सडवा मोहफूल किं 17 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.अमीन शफी शेख रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या  पुजारीटोला जंगल अड्ड्यावर 110 प्लास्टिक चुंगडीत 4400 किलो सडवा मोहफूल किं 3 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे.श्यामराव श्रीराम झाडे रा. संत रविदास वॉर्ड तिरोडा याच्या पुजारीटोला जंगल येथील अड्ड्यावर दारू गाळण्याचे साहित्य, 134 प्लास्टिक चुंगडीत 5360 किलो सडवा मोहफुल, 100 लिटर मोहफुलांची दारू असा एकूण 4 लाख 41 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून ताब्यात घेतला आहे.

तब्बल ₹12.64 लाखांचा माल जप्त

ऑपरेशन वॉश आऊट अंतर्गत सदर दोन दिवसांच्या कारवाईत तिरोडा पोलिसांनी एकूण 16 आरोपींवर गुन्हा नोंद केला. तर तब्बल 12 लाख 64 हजार 420 रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सोबत सपोनि हनवते, जोगदंड, महिला पोउपनि राधा लाटे, नापोशि बर्वे, बरवय्या, श्रीरामे, रक्षे, थेर, बांते, कुळमेथे, कटरे, तुरकर, टेंभरे, वाढे, पोशि सपाटे, भैरम, शेख, महिला नापोशि भूमेश्वरी तीरिले यांनी केली.