महिलांना 33 टक्के आरक्षण बिल पारित करा

0
12
“भाकप व महिला फेडरेशन च्या सभेत कॉम्रेड हिवराज उके यांचे मनोगत
 भंडारा :-  आम्हाला बहुमत मिळाल्यास महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा बिल लोकसभेत पारित करू असे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपने दिले होते. ते त्यांनी पाळले नाही म्हणून भंडारा पोलीस स्टेशन समोर निदर्शने करून महिलांना 33 टक्के आरक्षण बिल लोकसभेत पारित करा अशी मागणी कामरेड हिवराज उके यांनी केली.
12 सप्टेंबरला राणा भवन भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भारतीय महिला फेडरेशन च्या संयुक्त विद्यमाने देशव्यापी” मागणी दिनानिमित्त” कॉम्रेड रत्नाकर मारवाडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक कॉम्रेड हिवराज उके तसेच कमरेड प्रियकला मेश्राम ,ममता तुरकर, मनीषा तीतिर्मारे ,गजानन पाचे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते.
 या सभेत मार्गदर्शन करताना कॉम्रेड हिवराज उके यांनी सांगितले की 1996साली भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या व भाकप खासदार काॅ. गीता मुखर्जी यांनी लोकसभेत व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे म्हणून तत्कालीन  प्रधानमंत्री देवेगौडा यांच्या कारकिर्दीत  लोकसभेत बिल सादर केले. भाकप व  डावेपक्ष पक्ष वगळता सर्वांनी विरोध केला. मात्र कालांतराने राज्यसभेत बिल पारित झाले. पण आज पंचवीस वर्षे होऊनही लोकसभेत पारित होऊ शकले नाही.
 2014 व 2019 साली भाजप ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले की भाजपला बहुमत मिळाल्यास महिलांना 33 टक्के आरक्षण बिल आम्ही पारित करू. पण बहुमत व सत्ता मिळून सात वर्षे लोटूनही भाजपने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि महिला विरोधी दृष्टिकोन दाखखवून दिले.
   आणि म्हणून भाकप व महिला फेडरेशनने ,देशव्यापी मागणी दिन, पाळून महिलांना 33 टक्के आरक्षण देणारा बिल लोकसभेत पारित करा अशी मागणी केली तसेच या मागणीच्या समर्थनार्थ भंडारा पोलीस स्टेशन समोर निदर्शने आंदोलन करून माननीय प्रधानमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले. निवेदन भंडारा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री योगेश्वर पारधी यांनी निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी महिलांना 33 टक्के आरक्षण बिल पारित करा, इन्कलाब जिंदाबाद ,  महिलाओं के हक के लिए लढेंगे – लढेंगे तो जितेंगे इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
15 सप्टेंबरला लोकल व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरु करा या मागणीसाठी सौंदळा (साकोली) येथे   रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भंडारा शहरातील पाणीप्रश्न, शेतकरी आंदोलनाचे समर्थन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कंत्राटी नर्सेसना पुनर्नियुक्ती, बेरोजगारांना रोजगार किंवा बेकारी भत्ता,वनहक्क कायद्या अंतर्गत पट्टे, इत्यादी मागण्यासंबंधी चे मार्गदर्शन कॉम्रेड हिवराज उके यांनी केले.
      भाकपचे भंडारा तालुका सचिव कामरेड गजानन पाचे यांनी संचालन केले तर महिला फेडरेशनच्या सचिव कामरेड ममता तुरकर यांनी आभार प्रदर्शन केले. सभेत कॉम्रेड वामनराव चांदेवार,गणेश चिचामे, महादेव आंबाघरे ,रमेश पंधरे,दिलीप ढगे, गोपाल चोपकर ,नंदा कोसरकर, प्रज्ञा मेश्राम ,मंगेश माटे, ताराचंद देशमुख, साधना आगासे, सीमा चौधरी इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.