34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू

गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू

0
205

blank

लाखनी– तालुक्यातील पालांदूर परिसरातील रेंगोळा येथील घटना गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात ट्रॅक्टर पलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबर 2021 ला 3.40 च्या सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मृतकाचे नाव लकी नरेश कान्हेकर वय २२ वर्षे गाव रेगोळा हा व्यक्ती घरून काही कामातनिमित्त ट्रक्टर घेऊन जात असताना वाटेतच वाहण्यावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गावालगत असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यात पलटला चालकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

blank