चिखली – मेहकर रोडवर मुंगरी फाट्याजवळ ट्रकचा भीषण अपघात

0
17

बुलडाणा,दि.08ः चिखली-मेहकर रोडवर मुंगरी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या (एम एच 48 एजी 7820) ट्रेलरला (एम एच 20 डी इ 4465) या क्रमांकाच्या म्हशीने भरलेल्या आयशर ट्रकने 8 एप्रिलला सकाळी 9 वाजता जोरदार धडक मारली. या अपघातात दोन जण ठार तर एक जखमी झाला.म्हशींना वाहून नेणार्‍या आयशर ट्रकने मेहकर कडून चिखलीकडे जात असताना मागून येऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात 2 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाले. ठार झालेले व्यक्ती औरंगाबाद येथील असल्याची
प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात 12 जनावरे ठार झाली तर 4 जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. गंभीर झालेल्या व्यक्तींना बुलबु डाणा येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहनांमधील जखमी असलेल्या म्हशींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर तातडीने पोलिस हजर होऊन पुढील तपास करत आहेत.