मी सदैव गोर गरीब निराधार महिलांच्या पाठीशी आहे

0
20

आमदार सहषराम कोरोटे यांचे प्रतिपादन.
देवरी येथे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत ८० निराधार महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजारांचे धनादेश वाटप
देवरी, ता.०८: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील निराधार महिलांना आर्थिक सहाय्य करण्यात विलंब झाला. परंतु शासनस्तरावर सतत पाठपुरावा करून लवकरात लवकर आर्थिक मदत कसे करता येईल, यासाठी  प्रयत्न केले. मी सदैव गोर-गरीब निराधार महिलांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

ते गुरुवारी स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गत एकूण ८० निराधार महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमात महिलांना धनादेश वाटप आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राधेश्याम बागडीया, देवरीचे नगरपंचायतचे काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक सबाजीत सिंग भाटिया(शैंकी), नगरसेवक पंकज शहारे, देवरीचे तहसीलदार अनिल पवार  उपस्थित होते.

यावेळी देवरी तालुक्यातील ८० निराधार महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे आणि शेतकरी आत्महत्या प्रकरणात गोटाबोडी येथील यशोदा वालापुरे यांना १ लाख अशा प्रकारे एकूण १७ लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व उपस्थितांचे आभार तहसीलदार पवार यांनी मानले.