विजेच्या धक्क्याने वीस वर्षीय युवकाचा मृत्यू

0
134

आमगाव,दि.8- नुकतीच बाराबीची परीक्षा दिलेल्या तालुक्यातील पदमपूर येथील एका 20 वर्षीय युवकाचा विद्यूत प्रवाहित तारांचा स्पर्श झाल्याने मृ्त्यू झाल्याची घटना आज (दि.08) रोजी घडली. या घटनेने पदमपूर गावात शोककळा पसरली आहे.

मृताचे नाव नितेश नेवारे (वय 20), राहणार पदमपूर असे आहे.

सविस्तर असे की, नितेशनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली. शेतकरी कुटुंबातील असल्याने कुटुंबाला मदत म्हणून तो आज गावातीलच भरत शेंडे यांच्या शेतात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. गावत कापत असताना श्री शेंडे यांच्या बोरवेल ला विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या तो संपर्कात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या परिवारातील सदस्यांसह गावात शोककळा पसरली आहे.

आमगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आह.