नाना पटोलेंनी घेतली शरद पवारांची भेट:म्हणाले – येत्या 2 दिवसात आम्ही पुन्हा भेटणार

0
61

महाराष्ट्रातील वातावरण सध्या चांगलेच तापलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. काँग्रेसच्या काही आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट नाराजी व्यक्त केली होती. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ठरल्याप्रमाणे किमान समान कार्यक्रमानुसार कारभार चालवण्यास सांगितले होते. यानंतर आज नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया, राज्यातील वीजेचा प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा झाल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

आज झालेल्या भेटीत तपास यंत्रणाच्या कारवाया आणि महाराष्ट्रातील भारनियमनाचे संकट यावर चर्चा केली. या भेटीनंतर येत्या 2 दिवसात आम्ही पुन्हा भेटणार असून राज्य पातळीवरील महत्वाचे निर्णय घेऊ, असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर चाललो आहे, शरद पवार हे देखील सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळं आणखी दोन दिवसानंतर आम्ही दौऱ्यावरुन आल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. यावेळी आम्ही विविध मुद्यांवर चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी म्हटलं.

केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद –
याशिवाय, केंद्राने कोळसा न दिल्याने प्रकल्प बंद पडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर भारनियमनाचे संकट आल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच मंत्रींमडळ विस्ताराबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, की मंत्रींमडळ विस्ताराबाबत आमची कोणतीही मागणी नाही, हायकमांड काय तो निर्णय घेतील. कोणताही चर्चा झाली नाही. त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या हायकमांडला आहे.

आयएनएस विक्रांतवरून भाजपवर टीका –
यावेळी पटोलेंनी आयएनएस विक्रांतवरून भाजपवर टीका केली. आयएनएस विक्रांत जहाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जी वर्गणी गोळा केली होती, त्याचा हा प्रश्न आहे. विषयाला वेगळे वळण देण्याची प्रक्रिया आहे. पैशांचा प्रश्न आहे, याचे उत्तर का भाजप देत नाहीये, असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच आजच्या बैठकीत भाजपाल कसे उत्तर देता येईल, यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.