मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड

0
58

अर्जुनी-मोर पोलिसांचे यश
अर्जुनी-मोर, संपूर्ण विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरांच्या टोळीला गजाआड करण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले आहे.
गेल्या 07 तारखेला अर्जुनी-मोर येथील बँक ऑफ इंडिया समोर उभी असलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती.

पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तात्काळ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांनी तपासाची चक्रे फिरवत यातील दोन आरोपी आकाश कमलाकर पवार व अजय श्रीराम तेलंग रा. गोंदिया यांना अटक केली. अर्जुनी-मोर पोलिसांनी या आरोपींकडून अर्जुनी मोरगाव, वडसा जि. गडचिरोली व नागपूर येथे चोरी केलेल्या अंदाजे 1,00,000 रू किमतीच्या 3 मोटर सायकल हस्तगत केलेल्या आहेत.

गुन्ह्यातील आरोपी यांना आज न्यायालयात हजर केले असता 20 तारखे पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक गोंदिया श्री विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर व पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी तागड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम तसेच पोलिस हवालदार रोशन गोंडाणे, राहुल चिचमलकर, प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, श्रीकांत मेश्राम, मोहन कुईकर, गौरीशंकर कोरे यांनी केला आहे.