भरधाव कंटेनरच्या धडकेत ऑटो रिक्षातील तिघे ठार

0
46

बुलढाणा : २० एप्रिल – भरधाव वेगातील कंटेनरने दिलेल्या धडकेत ऑटो रिक्षातील तिघे ठार झाल्याची दुदैर्वी घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव ते तालसवाडा दरम्यान तांदुळवाडी फाट्यानजीक घडली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एम एच २0 डि सी २७८४ क्रमांकाचा ऑटो रिक्षा मुक्ताईनगर कडून मलकापूर कडे येत होता. तर एन एल 0१ ऐई ४५४३ क्रमांकाचे कंटेनर मलकापूर कडून मुक्ताईनगर कडे जात होते. दरम्यान तांदुळवाडी फाट्यानजीक वळणावर कंटेनरने ऑटोरिक्षा जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोरिक्षा तील आयुब खान अजलुद्दीन खान वय ४८ रा. गाजियाबाद उत्तर प्रदेश हा इसम जागीच ठार झाला. दरम्यान ऑटो रिक्षातील गोविंद र्शावण जाहीर वय २५ वर्षे रा. शिवतारा ता. हदगाव, जि. नांदेड व नफीसखान अलिजानखान दिंडोरा जहागिरपुर या दोघां गंभीर जखमींना पोहेका श्याम शिरसाट, पोका योगेश तायडे, मुन्ना पानसरे व पत्रकार गणेश तायडे यांच्या मदतीने खाजगी वाहनाद्वारे उपजिल्हा रुग्णालयात तातडीने पाठविण्यात आले. त्या दोघांची परिस्थिती गंभीर असल्याने एकाची रस्त्यातच तर दुसर्याची रुग्णालयात पोचल्यावर काही वेळातच प्राणज्योत मालवली. घटना कळताच पीएसआय संजय ठाकरे, पोका प्रवीण काकडे, संदीप खोपणे व सचिन पवार यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत रुग्णालयात जाऊन आधार कार्ड व मोबाईल द्वारे तिघांची ओळख पटविली.
या प्रकरणी वृत्त लिहेपयर्ंत फरार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. पुढील कार्यवाही पीएसआय संजय ठाकरे करीत आहेत.