बीड RTOकार्यालयात दलालांचा सुळसुळाट;बनावट स्वाक्षऱ्या करून कागदपत्रे तयार करणाऱ्या ५ एजंटवर गुन्हा दाखल

0
18

बीड|-: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरु असून पैशासाठी खोटी कामे केली जात होती.अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. २२) रोजी पाच एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे खोटे कागदपत्र सादर करणे, बनावट आरसी तयार करणे, खोट्या स्वाक्षऱ्या करून वाहन हस्तांतरण करणे, वाहनावरील बोजा उतरवणे इत्यादी कामासाठी कार्यालयीन अधिकाऱ्यांची तसेच शासनाची फसवणूक केली जात होती. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्या फिर्यादीवरून गुफरान बेग, सय्यद इरफान, दिगंबर गायकवाड, बाबा काजी, शहाजान खान (सर्व रा. बीड) यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्या सतर्कतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या घटनांमुळे बीड मध्ये खळबळ उडाली आहे.