शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

0
64

अहमदनगर | राजकीय वाद अगदी टोकाला गेला असेल पण राज्याची राजकीय संस्कृती खालच्या थराला गेल्याचं चित्र नव्हतं ,असं नागरिक चर्चा करत आहेत. नागरिक सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना नाराजी वर्तवत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी माहिती समोर येत आहे. शिवसेना (Shivsena) मंत्र्याच्या (Minister) स्वीय सहाय्यकावर (PA) गोळीबार करण्यात आला आहे.

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर गोळीबार झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्यात राजळे यांना गोळी लागली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. पाच लोकांच्या टोळक्यानं राजळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. राज्यातील मंत्र्याच्या पीएवर हल्ला झाल्यानं राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. रात्रीच्या वेळी राजळे हे आपल्या गाडीनं घारकडं निघाले होते. घोडेगाव परिसरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

दरम्यान, हल्ल्यात राजळे यांच्यावर जोरदार गोळीबार करत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस सध्या वेगानं तपास करत आहेत. अद्यापी कोणत्याही संशयीत व्यक्तीला अटक करण्यात आली नाही.