तुमसर येथे आयपीएल सट्टय़ावर धाड

0
18

भंडारा- तुमसर येथील गोवर्धन नगरमध्ये एका घरात क्रिकेट आयपीएलवर ऑनलाईन सट्टा खेळवणार्‍यांवर धाड टाकून चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महेंद्र सहदेव मेर्शाम (२७), वीरेंद्र भाविक काठाने (३१), संजय हंसराज साठवणे (२९) तिनही राहणारे गोवर्धननगर तुमसर, निलेश शिवकुमार साठवणे (२८) रा.गांधी वार्ड तुमसर असे आरोपींची नावे आहेत.
क्रिकेट आयपीएलच्या संपूर्ण खेळामध्ये लाखो रुपयांचा सट्टा बाजार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने त्या आधारे तुमसर येथील गोवर्धन नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून एका घरामध्ये सुरु असलेला ऑनलाईन सट्टय़ावर धाड घातली. तिथून महेंद्र सहदेव मेर्शाम (२७), वीरेंद्र भाविक काठाने (३१), संजय हंसराज साठवणे (२९) तिन्ही राहणारे गोवर्धननगर तुमसर, निलेश शिवकुमार साठवणे (२८) रा.गांधी वार्ड तुमसर या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ३ मोबाईल, ३ हजार रुपये रोख, आयपीएलचे आकडे लिहिलेली पट्टी साहित्य असा एकूण ११ हजार ५0३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर तुमसर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपासात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पथकाने केली.